पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमध्ये नाकाबंदी
बंगळुरु, दि. 06, सप्टेंबर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी शहरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला. शहरात प्रवेश करणा-या सर्व टोलनाक्यांवर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
सर्व वाहनांच्या हालचालींवर आणि आंतरराज्यीय सीमांवर लक्ष ठेवले जात आहे. या संदर्भात आम्ही आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू पोलिसांनाही कळवले आहे, असे पोलीस उपायुक्त एम. एन. अनुचेत यांनी सांगितले.