Breaking News

राणे आणि शिवसेनेनं ही कमरेचं सोडलं!

दि. 27, सप्टेंबर - शिवसेनेत राहून मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये अपेक्षेसारखं पद मिळालं नाही. गेल्या बारा वर्षांत पुलाखालून भरपूर पाणी  वाहिलं आहे. त्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ नक्की झाला आहे. राणे भाजपत गेल्यानं राज्याची राजकीय समीकरणं फार बदलणार नाही. एक आक्रमक नेता,  अभ्यासू नेता आणि चांगला वक्ता हेच त्यांचं भांडवल आहे. राणे यांनी शिवसेना सोडताना त्यांच्याबरोबर 12 आमदार होते. ते ही नंतर त्यांच्याबरोबर राहिले नाहीत.  काहीजण शिवसेनेत, काही काँग्रेसमध्ये, तर काही राष्ट्रवादीत आहेत. काहींनी भाजपला जवळ केलं आहे. राणे यांनीही आता भाजपची वाट धरली आहे. खरं तर राणे  यांची राजकीय ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही.
विधानसभेत दोन सदस्य एवढंच राणे यांचं आता राजकीय बळ राहिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच त्यांची संघटनात्मक ताकद राहिली आहे. राणे यांनी स्वत:  महाराष्ट्र पिंजून काढण्याचा ठरविलं असलं आणि शिवसेना तसंच काँग्रेस रिकामी करण्याची भाषा केली असली, तरी त्यावर कोणीच विश्‍वास ठेवणार नाही. असं  असताना राणे यांच्या भाजप प्रवेशाचं उगीच भांडवल करण्याचं काहीच कारण नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसनं राणे यांना फार महत्त्व द्यायचं नाही, हे ठरविलं आहे. राणे  यांच्या मागं लागलेलं अंमलबजावणी संचालनालयाच्या चौैकशीचं श्ाुक्लकाष्ठ आणि त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता यामुळं त्यांचं भाजपत जाणं ही त्यांची  मजबुरी असू शकते. अशा परस्थितीत राणे यांना अनुल्लेखानं मारणं हा त्यावरचा प्रभावी उपाय होता; परंतु राणे यांचा भाजपप्रवेश म्हणजे जणू शिवसेनेलाच भाजप  मोठं खिंडार पाड़तो आहे, की काय अशी भीती शिवसेनेला वाटत असावी. त्यामुळं राणे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करून शिवसेनेनं जसं हसू करून घेतलं  आहे, तसंच हसू राणे यांच्या मुलांनीही केलेल्या टीकेमुळं त्यांचंही झालं आहे.
शिवसेना असो, की राणे; दोघांचीही अवस्था सारखीच. समंजसपणाची अपेक्षा दोघांकडून करणंही चुकीचंच. राणे यांच्या भाजप पˆवेशाच्या चर्चेवर शिवसेनेकडून  पोस्टर लावून खालच्या भाषेत टीका करण्यात आली होती. शिवसेनेच्या या टीकेला आता माजी खासदार नीलेश राणेंनी पˆत्युत्तर दिलं आहे. नीलेश राणेंनीही  शिवसेनेवर टीका करताना पातळी सोडली आहे. शिवसेनेला नारायण राणेंचा भाजप प्रवेश जिव्हारी लागला आहे. त्यामुळंच शिवसेनेनं वरळीत पोस्टर लावत  राणेंवर निशाणा साधला. या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेनं राणेंवर पातळी सोडून टीका केली. या टीकेला नीलेश राणेंनी त्याच भाषेत उत्तर दिलं.  दसरा-दिवाळी अंक 2017 असं शीर्षक देत त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.  शिवसेनेकडून वारंवार भाजपला दिला जाणारा सत्ता सोडण्याचा  इशारा, मातोश्री 2 ची उभारणी, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक अशा अनेक मुद्यांवरून नीलेश राणेंनी शिवसेनेवर शरसंधान साधलं. टि्वटरच्या माध्यमातून  त्यांनी या सर्व मुद्यांवरून शिवसेनेवर पातळी सोडून टीका केली. छोटा पेंग्विन असा उल्लेख करून  नीलेश राणेंनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंवरही अपˆत्यक्ष  टीका केली. मुंबईभर बॅनर लावून त्याच भाषेत लायकी काढणार, असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं शिवसेना आणि राणे कुटुंबातील संघर्ष आणखी  वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जशी शेलकी विशेषणे वापरून विरोधकांची सालटी काढत, तशी सालट काढणं कुणालाही शोभत नाही.  बाळासाहेब हे बाळासाहेब होते. शिवसेनेनं दोनच दिवसांपूर्वी वरळीत पोस्टर लावून नारायण राणेंवर जोरदार टीका केली. इच्छा माझी पुरी करा या शीर्षकाखाली  नारायण राणे यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आलं होतं. शिवसेनेचे पˆवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या  माध्यमातून नारायण राणेंवर कडाडून टीका केली होती. राणेंविरोधात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये किमान सभ्यतेच्या मर्यादा ओलांडण्यात आल्या होत्या. या  पोस्टरचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पˆकरणी अरविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद भोसले यांनी राणे यांच्या  नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारं होर्डिंग वरळी नाक्यावर चर्चेचा विषय होते. या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलं आहे.  दुसरीकडं राणे यांना महसूल वा अर्थमंत्रिपदाची लेखी हमी हवी आहे. भाजप त्यांची ही अट मान्य करणार का, हा खरा प्रश्‍न आहे. बारा वर्षांत मुख्यमंत्रिपदाचे  केवळ गाजर दाखवल्याचा आरोप करून काँगˆेसला सोडचिठ्ठी देणारे राणे यांनी आता मात्र या पदाचा हट्ट सोडला आहे. अर्धा तास चर्चा केल्यानंतरही भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप पˆवेशाबाबत राणेंना कोणतेही संकेत दिले नाहीत. असं असताना शिवसेनेनं राणे यांना अकारण जास्त महत्त्त्व द्यायला नको  होतं. शिवसेना जेवढी चवताळून उठेल, तेवढेच राणे आक्रमक होतील. त्यातून शिवसेनेचा कमी आणि राणे यांचाच जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. राणे आणि  शिवसेनेनं परस्परांचं वस्त्रहरण करताना कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं आहे, एवढं मात्र खरं.