Breaking News

समता-समरसतेचा सेतू - देवेंद्र फडणवीस

दि. 27, सप्टेंबर - संत महापुरूषांची भुमी म्हणून महाराष्ट्राच्या भूमीत पुरोगामित्व रूजल,बहरलं.या पुरोगामित्वाचे अधिष्ठान घेऊन समाजकारण आणि पाठोपाठ  राजकारण आपली वाटचाल करू लागले.विशेषतः यशवंतराव चव्हाण यांनी सार्वजनिक जीवनात सक्रीयता दाखविल्यानंतर पुरोगामित्वाने राजकारणात जोर  धरला.मानसपुञ शरद पवार यांनी या चळवळीचा नियोजनबध्द वापर करून घेतला. पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन विचारांमधील हे शीत युध्द राजकारणात  वेळोवेळी आपले अस्तित्व दाखवत असले तरी तत्कालीन राजकारण्यांनी प्रसंगी मधला मार्ग काढून सत्तेच्या जवळ जाणारा मार्गही चोखाळला.शरद पवार यांचा यात  हातखंडा होता आणि आहे.
पुरोगामी विचारसरणी समतेच्या जवळ नेणारी आहे या उलट प्रतिगामी विचारसरणीला हवी आहे ती समसरता.या दोन विचारधारेत नेमका फरक काय हे समजून घेणे  तितकेच महत्वाचे आहे.जातीव्यवस्थेला किंवा जातीभेदाला समतेच्या बैठकीत स्थान नाही.समरसता जातीव्यवस्था कायम ठेवून सर्वांना सोबत घेण्याची भाषा बोलते.या  दोघांमध्ये मुळ गाभा सोडला तर तसा फरक जाणवत नाही.गाभ्यात असलेला सुक्ष्म फरक हाच खरा कळीचा मुद्दा आहे.  आजचे सामाजिक वातावरण लक्षात घेतले  तर एक बाब प्रकर्षाने नजरेत भरते.समता आणि समरसता हे दोन विचार एकञ नांदतांना दिसतात.सामाजिक सलोख्यासाठी हा एक चांगला संकेत मानायला  हवा.समाज व्यवहारात राजकारणात आणि समाजकारणातही समाज जात पंथ धर्माचा विचार करीत नाही.इथे समता पहायला मिळते.अर्थात मतदानाचे राजकारण इथे  अपवाद आहे हा भाग वेगळा.जेंव्हा व्यक्तीगत किंवा कौटुंबिक व्यवहाराची बाब येते तेंव्हा जातीची किंवा धर्माची भुमिका निर्णायक ठरते.ही प्रतिगामी विचारसरणीची  समरसता आहे.
आजच्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा भविष्याच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास राजकारणात प्रभावी असलेल्या राजकीय मंडळींच्या भुमिकेकडे दुर्लक्ष करता  येणार नाही,या पार्श्‍वभुमीवर राजकारणाच्या नथीतून मारलेला तीर समाजकारणावर किंबहूना सामाजिक सलोख्यावर दुरगामी परिणाम करतो.म्हणून आज महाराष्ट्राच्या  राजकारणात निर्णायक भुमिका बजावण्याची कुवत असलेले शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भुमिका महत्वाची ठरते. शरद पवार यांच्या बाबत एक समज दृढ  झाला आहे.शरद पवार बोलतात त्या उलट ते कृती करतात.फुले शाहू आंबेडकर विचारांचे अधिष्ठान स्वीकारून हयातभर राजकारण केलेले शरद पवार उक्ती आणि  कृतीतील असंबधामुळे समाजकारणात खलनायक म्हणून अधिक चर्चेत आहेत.समतेची बैठक विचारात असून चालत नाही तर ती कृतीत यायला हवी .शरद पवार  यांच्या संदर्भात हे सत्य कुणी ठामपणे दाखवू शकत नाही.
देवेंद्र फडणवीस यांचे नेमके शरद पवार यांच्या उलट आहे.फडणवीस यांना समाजकारणाचे किंवा राजकारणाचे बाळकडू संघाच्या शाखेत मिळाले.म्हणजे त्यांच्या  विचारांना समरसतेची बैठक आहे.प्रत्यक्षात ते समतेकडे झुकल्याचे कृतीतून दिसते.फडणवीस यांनी गेल्या पाच सात वर्षात समाजकारणात घेतलेली भुमिका समता  आणि समरसतेचा सुंदर मिलाप घडवून आणणारी आहे.याचा प्रत्यय मुख्यमंञी पदाची सुञे स्वीकारल्यानंतर अधिक प्रकर्षाने येतो आहे.
थेट सांगायचं झालं तर लोकशाही आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण प्रदुषीत होऊ लागले होते.यामागे  कुठल्या शक्ती कार्यरत होत्या किंवा आहेत हा अग्रस्तंभाचा स्वतंञ विषय होऊ शकतो.माञ एका विशिष्ट विचारसरणीचे सरकार सत्तेवर आल्यामुळे सामाजिक सलोखा  आणि समता यांचा कडेलोट होईल अशी बतावणी करून समाजात जाणीवपुर्वक भितीचे वातावरण निर्माण करण्यात एक गट कमालीचा यशस्वी ठरला.त्यात सत्तेपासून  दुर गेलेल्या काही मंडळींनी भर टाकली.बहुजन विरूध्द तीन टक्के असा सरळ लढा लावण्याचे कुट कारस्थानही खेळले गेले.थोडक्यात फडणवीस ज्या विचारसरणीचे  प्रतिनिधीत्व करतात विचारसरणीचा महाराष्टाला धोका असल्याचा बनाव आहे या भितीतून समाजकारण गढूळ बनविले गेले. परिस्थिती स्फोटक होती.कुठलाही  अविचारी मुख्यमंञी ही परिस्थिती हाताळण्यात यशस्वी होणे शक्य नव्हते,तथापि देवेंद्र फडणवीस यांनी अशाही परिस्थितीत मी पुरोगामी महाराष्ट्राचा मुख्यमंञी आहे हे  भान ढळू दिले नाही.पक्षाची विचारसरणी आणि महाराष्ट्र समाजाची अपेक्षा यांची सांगड घालून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंञी पदाचा कारभार सुरू केला.मराठा  बहुजन समाजाच्या पदरात शक्य तेव्हढे न्यायाचे माफ टाकण्याचा मुख्यमंञ्यांचा प्रामाणिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील वेगळा आयाम अधोरेखित  करतो.आज महाराष्ट्रात अनेक प्रश्‍न ऐरणीवर आहेत.या प्रश्‍नांची सोडवणूक करतांना सरकारचा तोल ढळू न देता परिणामकारक मार्ग काढण्याचे मुख्यमंञ्यांचे कसब  मुत्सद्दीपणावर शिक्कामोर्तब करते,देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्वृत्वाचे एका वाक्यात वर्णन करायचे म्हटले तर समता आणि समरसतेचा मिलाफ घडवून दोन  विचारसरणीत सलोख्याचा सेतू बांधण्यात मुख्यमंञी अल्पकाळात यशस्वी ठरलेत.असेच म्हणावे लागेल.