Breaking News

नारीशक्तीचा राष्ट्र उभारणीत सहभाग वाढविण्यासाठी भाजपा महिला मोर्चा प्रयत्नशिल : किरणताई महल्ले

बुलडाणा, दि. 22, सप्टेंबर - स्त्रीचे जीवन केवळ चूल आणि मूल एवढ्यापूरते मर्यादीत न राहता नारी शक्तीचा राष्ट्र ऊभारणीतील सहभाग वाढावा या साठी भारतीय  जनता महिला मोर्चा प्रयत्नशिल आहे असे प्रतिपादन महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा किरणताई महल्ले यांनी केले. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी व  विस्तारक बैठकीस संबोधित करतांना त्या बोलत होत्या. मंगळवार, दि. 19 सप्टेंबर रोजी स्थानिक अंबिका अर्बनच्या सभागृहात आयोजित या बैठकिस भाजपा प्रदेश  कार्यकारिणी सदस्या व जि.प.सभापती श्‍वेताताई महाले पाटील, जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अर्पणाताई कुटे, अर्चना पांडे  महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा, डॉ संध्याताई कोठारी, नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्रीमती महल्ले यांनी आगामी निवडणूका आणि पक्ष विस्ताराच्या कार्यात महिलांनी भरीव योगदान द्यावे असे आवाहन केले. श्‍वेताताई  महाले पाटील यांनी राजकीय क्षेत्रात काम करतांना महिला कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवावी असे सांगीतले. भाजपा महिला मोर्चातील पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी संघटना बांधणीसह सरकारी योजनांचा लाभ वंचित वर्गातील कुटूंबांपर्यंत पोहचवावा अशी अपेक्षा श्‍वेताताई महाले यांनी व्यक्त केली. भारतीय जनता  पक्षाच्या भरभराटीमध्ये बुथवरील महिला कार्यकर्त्यांची बहुमोल भूमिका असल्यामुळे पक्षात महिला नेतृत्वाचा सदैव सन्मानच होत आला आहे असे श्‍वेताताई महाले  पाटील म्हणाल्या. सदर बैठकित महिला मोर्चा बुथ विस्तारक योजना व बुथ समिती स्थापनेचा आढावा घेण्यात आला. खगामी कार्यक्रमांची माहिती देखील यावेळी  देण्यात आली. जिल्हा बैठकित सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात पक्षकार्य करतांना येणारे अनुभव, उद्भवणार्या समस्या आणि पक्ष  नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. त्यांच्या सर्व प्रश्‍नांचे निराकरण यावेळी करण्यात आले. या बैठकिस  जळगाव जामोद नगराध्यक्षा सिमा डोबे,शकुंतला बाहेकर,  वजिराबी अंनिस शेख, अलका देशमुख, सुनिता भालेराव, सुनंदा शिनगारे, डॉ ज्योती खेडेकर, सरस्वती वाघ, विमल देव्हडे, मनिषा सपकाळ, चञलेखा पुरी, रेखा  कस्तुरे, अर्चना खबुतरे, कल्र्पना ढोकणे याच्यांसह जिल्हा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्या, तालुका व शहर पदाधिकारी , स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला  लोकप्रतिनिधी व भाजपा महिला मोर्चाच्या बुथ विस्तारक व जिल्ह्यातील कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बैठकिचे सूत्रसंचालन कविता लंके यांनी केले.