Breaking News

जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेची वार्षिक सभा उत्साहात

बुलडाणा, दि. 22, सप्टेंबर - मागील वर्षी अचानक झालेली नोटाबंदी, आर्थिक क्षेत्रात नवनवीन बदल व येणारे कायदे, बँकींग क्षेत्रात खाजगीकरणामुळे वाढणारी  अंतर्गत स्पर्धा या सर्व आव्हानांचा मुकाबला करताना जिजामाता महिला बँकेने सभासदांचा विश्‍वास, ग्राहक सेवा आणि तत्परता या त्रिसूत्रीचा अवलंब करुन या  आर्थिक वर्षात केलेली प्रगती स्पृहनीय आहे, असे प्रतिपादन जिजामाता महिला बँकेच्या अध्यक्षा अनिता देशलहरा यांनी केले. 
जिजामाता महिला नागरी बँकेची 26 वी वार्षिक आमसभा दि. 16 सप्टेंबर रोजी स्थानिक पेठ भागातील श्रीराम जानकी अतिथी सभागृहात आयोजित करण्यात आली  होती. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सौ.देशलहरा बोलत होत्या. व्यासपीठावर बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती शिलाताई सांबारे, संचालिका कोमलताई झंवर,  डॉ.शोभा देशपांडे,  माणिक वाडकर, उषा संचेती, उमादेवी पंजाबी, सुमन राठोड, निता कस्तुरे, सुनिता पाटील, संगीता मोरे, छाया ढगे, संध्या दिवटे, नमिता  सावजी उपस्थित होत्या. दिपक अग्रवाल यांनी जिजामाता महिला बँकेच्या 2016-17 या आर्थिक वर्षाच्या अहवालाचे वाचन केले. यावेळी आमसभेला संबोधित  करताना बँकेच्या अध्यक्षा देशलहरा यांनी आर्थिक क्षेत्रातील सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा मुकाबला करुन जिजामाता महिला सहकारी बँकेने बुलडाणा अर्बनचे  संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालिकांचे सहकार्याने नवीन तंत्रज्ञान स्वीकार करुन या आर्थिक वर्षात ठेवीवाढ, निधीचे योग्य  नियोजन, सुरक्षित कर्ज वितरण, प्रभावी वसूली, काटकसरीचे धोरण व त्वरीत निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणी या बाबींचा अवलंब करुन बँकेच्या प्रगतीचा आलेख  चढता ठेवला असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वार्षिक आमसेभेला बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश देशलहरा, डॉ.संजय  पाटील, सनदी लेखापाल सचिन वैद्य, डॉ.अजय ढगे, नितीन सावजी यांचेसह बँकेच्या महिला सभासद, ग्राहक उपस्थित होते.