Breaking News

बुलडाणा अर्बन बीसीसीएन गरबा फेस्टीवलचे आयोजन

बुलडाणा, दि. 22, सप्टेंबर - शहर व परिसरातील मुला-मुलींच्या व पुरुष महिलांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदु ठरलेल्या आणि रसिकांच्या डोळयांचे पारणे फेडणार्या  बुलडाणा अर्बन बीसीसीएन याच्यावतीने यावर्षी देखील खास नवरात्रौत्सवानिमित्त गरबा फेस्टीवल 2017चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 
बुलडाणा अर्बन बीसीसीन यांच्यावतीने दरवर्षी गरबा फेस्टीवलचे भव्य प्रमाणावर आयोजन केले जाते. आतापर्यंत आयोजित झालेल्या गरबा फेस्टीवलला दरवर्षी शहर  व परिसरातील गरबा खेळणार्या मुला-मुलींनी, विद्यार्थी-विद्यार्थींनी तसेच रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावर्षी देखील 21 ते 29 सप्टेंबर या  कलावधीत चिखली मार्गावरील सहकार विद्यामंदिर परिसरातील सहकार सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानावर दररोज 9 दिवस सायंकाळी 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत  गरबा फेस्टीवल रंगणार आहे. बालगट, मध्यमगट तसेच मोठा गट अशा तीन गटात गरबा फेस्टीवल आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये लहान मुले-मुली, महाविद्यालयीन मुले-मुली तसेच महिला पुरुषांना गरबा फेस्टीवलमध्ये सहभागी होता येणार आहे. गरबा फेस्टीवल 2017 साठी विविध  बक्षिसे ठेवण्यात आली आहे. नऊ दिवस गरबा फेस्टीवलमध्ये सहभागी होणार्या स्पर्धकांनी पारंपारिक वेष व पोशाख परिधान करणे आवश्यक आहे. यामध्ये मुलींनी  पंजाबी ड्रेस विविध रंगात व मुलांनी कुर्ता व जिन्स परिधान करणे आवश्यक आहे. गरबा फेस्टीवलमध्ये भाग घेऊ इच्छिणार्यां स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी संजय  कस्तुरे, बुलडाणा अर्बन कंझ्युमर स्टोअर्स तसेच सुधिर भालेराव व नरेंद्र शर्मा यांचेशी संपर्क साधुन आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने  करण्यात आले आहे. नवरात्रौत्सवानिमित्त आयोजिता बुलडाणा अर्बन बीसीसीन गरबा फेस्टीवल 2017ची तयारी पुर्ण झाली आहे. दरम्यान गरबा फेस्टीवलच्या  आयोजनाच्या पृष्ठभूमीवर स्थानिक तिरुपती मंगल कार्यालयाच्या सभागृहात 20 सप्टेंबर पर्यँत गरबा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला देखील  इच्छूक गरबा स्पर्धकांनी प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदविला आहे. बुलडाणा अर्बन बीसीसीएन गरबा फेस्टीवल 2017 चा शहर व परिसरातील कलारसिक व  नागरीक प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.