Breaking News

राम रहिम यांचे ट्विटर खाते बंद, चित्रपट, मालिकेसाठीचा परवानाही रद्द

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - बलात्कारप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले बाबा राम रहीम यांचे खाते ट्विटरकडून बंद करण्यात आले आहे. चित्रपट  व मालिकांमध्ये काम करण्यासाठीचा त्यांचा परवानाही चित्रपट अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडून रद्द करण्यात आला आहे. भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन  दिग्दर्शक संघटनेनेही राम रहिम यांचा परवाना रद्द केला आहे.
अधिकृत वापरकर्ते अथवा संस्थेकडून एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार आल्यास आम्ही वेळोवेळी प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतो, असे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले.  राम रहिम यांचे चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्यासाठी चांगलेच प्रयत्न सुरू होते. पुढील काळात बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. ते नेताजी  सुभाष चंद्र बोस यांच्यावर चित्रपट काढणार होते. या चित्रपटात ते स्वत:च नेताजींची भूमिका करणार होते. त्यांच्या या प्रयत्नांना आता पूर्णविराम लागला आहे.