Breaking News

जय भवानी मंडळाच्या गणरायाची सानंदांच्या हस्ते आरती

बुलडाणा, दि. 01, सप्टेंबर - करण्यात येत असुन 30 ऑगस्ट रोजी जय भवानी मंडळाच्या गणरायाची माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आरती  करुन मनोभावे दर्शन घेतले. व समस्त भाविक भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृ.उ.बा.स.सभापती संतोश टाले, नगरसेवक राणा अमेयकुमार सानंदा, युवक काँग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुशार चंदेल,जय भवानी मंडळाचे अध्यक्ष ष्याम माळवंदे,  उपाध्यक्ष जग्गु गुजर,सचिव सचिन थोरात, आखाडा प्रमुख उत्तम माने, प्रितम माळवंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या अगोदर जय भवानी मंडळाने  गणेशोत्सवानिमित्त रेन वॉटर हार्वेस्टींग, चिकन गुनीया, लव्ह जिहाद, वाढती लोकसंख्या एक समस्या, स्त्री भु्रण हत्या आदी समस्यांबाबत जनजागृती करणारे विविध  प्रकारचे देखावे सादर केले आहे. यावर्षी मंडळाने देशभक्तीवर आधारीत “हिंदी चिनी भाई भाई, पिठ मे खंजर नजर ना आई’’हा देखावा आयोजित केला आहे. या  देखाव्याचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. जय भवानी मंडळाचे कार्यकर्ते समाज प्रबोधन  करण्यासाठी दरवर्षी नाविण्यपुर्ण देखावे तयार करतात. या देखाव्यामुळे समाज प्रबोधन होउन लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते, असे गौरवोद्गार याप्रसंगी  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी काढले. “हिंदी चिनी भाई भाई,पिठ मे खंजर नजर ना आई’’हा देखावा तयार करणारे मंडळाचे कार्यकर्ते दत्ता सरोदे  व शेख सलीम यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सत्कार केला. या देखाव्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढते. भारतीय सीमेवर चीनी  सैन्य घुसखोरी करुन भारतावर दबाव आणु पाहत आहे. भारतीय बाजारपेठेत सुध्दा मोठया प्रमाणावर चीनी वस्तूची विक्री होत असून भारतीयांनी चायनीज वस्तूंवर  बंदी घालावी, असा संदेष या देखाव्यातुन देण्यात येत आहे. भव्य प्रोजेक्टरद्वारे हा देखावा नागरीकांसाठी सादर करण्यात आला असुन देखावा पाहण्यासाठी  नागरीकांनी मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे.
प्रारंभी दिलीपकुमार सानंदा यांचे चांदमारी फैल भागात आगमन झाले असता जय भवानी मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतीशबाजी करुन उत्स्फुर्त स्वागत करण्यात  आले. मंडळाचे अध्यक्ष श्याम माळवंदे यांनी सानंदा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.  यावेळी सहसचिव गणेश शिंगाडे, कोशाध्यक्ष भावेश शिंदे, दत्ता सरोदे, सुरेश सरोदे, शत्रुघ्न माळवंदे, सदस्य पंकज पुरी, रामेश्‍वर तासतोडे, धिरज लोंडे, शिवा राहटे,  भारत राक्षे, नितीन निकम, हरि गायकवाड, अतुल झरेकर, विजय माळवंदे, वैभव पवार, शेैलेश तासतोडे, नितीन माळवंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठया संख्येने उपस्थित होते.