Breaking News

देऊळगाव मही गावात घडते हिंदु-मुस्लिम एकतेचे दर्शन!

मुस्लिम बांधव रियाज खाँ पठाण यांच्या हस्ते गणपतीची आरती : जय मल्हार गेणश मंडळाचा उपक्रम 

बुलडाणा, दि. 01, सप्टेंबर - हिंदु -मुस्लिम, शिख-ईसाई हम सब भाई... भाई या वाक्यानुसार देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही गावात हिंदु-मुस्लिम  एकतेचे दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून घडून येत असुन नुकतेच गणरायाचे आगमन झाले असतांना गावातील सार्वजनिक सण उत्सव हे सलोख्याच्या वातावरणात पार  पडत आहेत. यामध्ये हिंदु समाजबांधवांचा उत्सव असला तरीही मुस्लिम समाजातील अनेक मंडळीचा सहभाग असतो. देणगी देण्यापासून ते मिरवणूक व विसर्जन  होईपर्यंत मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित असतात. यावरुन हिंदु - मुस्लिम एकतेचे दर्शन देऊळगाव मही गावात घडविले जाते. देऊळगाव मही  येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात गावातील सर्व जाती धर्माचे सार्वजनिक  सण-उत्सव हे एकोप्याने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे गावात सदैव शांतता  नांदत आहे.
काही ठिकाणी समाजकंटकांमुळे दोन समजात जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केल्या जात असल्याने यामध्ये सर्वसामान्य माणूस होरपळून निघतो. आपल्या  जबाबदारपणाच्या आपलेपणाच्या वागण्यामुळे देऊळगाव मही गावाने सर्व प्रकारांना फाटा देत हिंदु - मुस्लिम एकतेचे दर्शन घडवित आगळा वेगळा आदर्श जातीय  सलोख्यातून निर्माण केला आहे. तिच परंपरा येथील जय मल्हार गणेश मंडळाने कायम ठेवली असून गणपती आरती मुस्लिम समाजातील रियाज खाँ पठाण यांच्या  हस्ते दरवर्षी घेण्यात येते. त्यामुळे मंडळाचे सर्वत्र कौतुक करुन शाबासकिची थाप दिली मिळत आहे.
अन्य गावांनी आदर्श घ्यावा : ठाणेदार नवलकर
अनेक गावात काही समाज विघातक लोकांमुळे किरकोळ कारणावरून वाद होतात. त्यांचे रूपांतर काही लोक आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे  गावात कायम हिंदू-मुस्लिम असा वाद तयार होत असतो. मात्र देऊळगाव मही येथील जय मल्हार गणेश मंडळाचे अध्यक्ष भगवान जोशी व त्यांचे सहकारी यांनी  मुस्लिम समाजातील व्यक्तींच्या हस्ते गणपतीची  आरती करून हिंदु-मुस्लीम जातीय सलोख्याचा दिलेला संदेश आदर्श ठरला असून इतर गावांनी सर्वच जाती धर्माचे  सण-उत्सवात सर्वांना सहभागी करुन उत्सव साजरे करण्याचा आदर्श अन्य गावांनी घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सारंग नवलकर यांनी केले आहे.
एक गाव एक गणपती संकल्पना उपयुक्त : संभाजी शिंगणे
तंटामुक्ती समितीच्या माध्यमातुन  गावात शांतता नांदावी कायदा व सुव्यवस्था अबाधित होवु नये याकरीता प्रयत्नरत असुन गावामध्ये हिंदु मुस्लिम दोन्ही समाज  आहेत परंतु सर्वांमध्ये आपलेपणाची भावना असुन गावातील सर्व जाती धर्माचे सार्वजनिक सण-उत्सव हे एकोप्याने साजरे होत आहेत. त्यामुळेच गाव शांततेचे प्रतिक  बनले आहे त्यातही गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविले जाते. दरवर्षी प्रत्येक मंडळाला मान दिल्या जातो त्यामुळे जातीय सलोख्यात आणखी भर  पडते, असे मत तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी शिंगणे यांनी व्यक्त केले आहे.