Breaking News

शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळते की नाही यात शंका- आ. थोरात

राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात प्रतिपादन

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी गरजेची  आहे. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे, असे प्रतिनपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित होते.
यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, राजेश मालपाणी, सभापती निशा कोकणे, शिवाजीराव थोरात, शंकर खेमनर, अजय फटांगरे, रामदास वाघ, कैलास सोमानी, साहेबराव गडाख, डॉ. सोमनाथ सातपुते, सतिषराव कानवडे, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, नवनाथ अरगडे, मिलिंद कानवडे, आर. बी. रहाणे, खेमचंद निहलानी, कल्पेश मेहता,रावसाहेब नवले,सुरेश थोरात,बाळासाहेब गायकवाड,सिताराम पा.वर्पे, रमेश गुंजाळ,अ‍ॅड.नानासाहेब शिंदे, अवधुत आहेर, संपतराव गोडगे, आर.बी. सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, गोरक्षनाथ सोनवणे, निसार शेख, बाळकृष्ण दातीर, केशवराव मुर्तडक, अर्चना बालोडे,  सुलभा दिघे, सुनिता अभंग, स्वाती मोरे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शवार येथील सहकार उभा आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न केला आहे. अमृतवाहिनी बँकेने अनेक कुटुंबांना मदत करतांना सभासद,ठेवीदार, कर्जदार यांचा मोठा विश्‍वास निर्माण केला आहे. संगमनेर तालुक्यात  ग्रामीण भागासह शहरात मोठे पंतसंस्था जाळे निर्माण झाले. अनेक राष्ट्रीय बँका शहरात येत आहेत. आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी अमृतवाहिनी बँक ही जनतेच्या हक्काची बॅक झाली आहे. या बँकेच्या सर्व शाखा सक्षमपूर्ण कार्यरत असून सतत ऑडिटचा अ वर्ग बँकेने टिकवून जवळपास 300 कोटींच्या ठेवी उभ्या केल्या आहेत. यावेळी राजेश मालपाणी यांनीही मनोगत व्यक्त केले. याबैठकीचे नोटीस वाचन मॅनेजर लक्ष्मण वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर अ‍ॅड. नानासाहेब शिंदे  यांनी आभार मानले. यावेळी सभासद महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.