Breaking News

कुकाणे ग्रामपंचायत हद्दीत आयुर्विमा महामंडळ बसविणार एल ए डी दिवे!

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - ग्रामपंचायतीला पुरस्कारापोटी 1 लाख रुपयांचा धनादेश न देता ग्रामविकासासाठी 50 एल ईडी दिवे देण्याचा निर्णय आयुर्विमा महामंडळाने घेतला आहे. आयुर्विमा महामंडळाच्या या सामाजिक भानाविषयी ग्रामस्थांमधून धन्यवाद देण्यात आले. यावेळी महामंडळाचे विकास अधिकारी प्रदीप औटी, सरपंच उज्वला भोसले, आयुर्विमा महामंडळाचे शाखा प्रमुख राजेंद्र भोगले, निशांत पाटील, उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, माजी सरपंच दौलतराव देशमुख, प्रा. मछिंद्र भोसले, ग्रामविकास अधिकारी आर.पी. बटूळे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता गरड, स्वाती कासार, शोभा गवळी, छाया गोर्डे, नंदा गरड, अपूर्वा गर्जे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना औटी म्हणाले, की विश्‍वास आणि सेवा यांच्या आधारे एल. आय. सी. ने देशात भरारी घेतली आहे. कुकाणा ग्रामपंचायतीला मिळविलेल्या पुरस्काराचे श्रेय गावातील एल. आय. सी. कंपनीशी जोडलेल्या ग्रामस्थांचा तसेच त्यासाठी प्रयत्न करणार्‍या विमा प्रतिनिधींचा आहे. कार्यक्रमासाठी भारत गरड, कारभारी गोर्डे, वसंत गवळी तसेच  विमा प्रतिनिधि पोपट भूमकर, संजय भूमकर, योगेश तागड, आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.