Breaking News

सर्वोदय गणेश मंडळाने जपला सांस्कृतिक वारसा

अकोले, दि. 01, सप्टेंबर - येथे आदिवासी, ग्रामीण बाज कायम राखत पारंपारिक व सांस्कृतीक वारसा जपण्याचे काम सर्वोदय कला व क्रीडा मित्रमंडळाने केले  आहे.31 वर्षापूर्वी राजूर मधील तरुणांनी एकत्र येत सर्वोदय कला व क्रीडा मित्रमंडळाची स्थापना करत गणेशोत्सवास सुरुवात केली. गणेशोत्सव साजरा करीत  असताना त्यात पारंपारिक व सांस्कृतीक वारसा जपण्याचे काम केले. त्याबरोबर सामाजिक भान ठेवत बेटी बचाओ, बेटी पढाओ चा असा संदेश नागरिकाना देण्यात  आला. 
अक्षय कोंडार, विशाल चौधरी,  प्रसाद देशमुख,  अनिकेत धांडे, कान्हया दुर्वे, अमित बांबेरे, विक्रांत कोंडार, सुमित कोंडार, मोन्या आवारी, समीर भारमल, विशाल  कोंडार व त्यांचे सहकारी मंडळाचे कामात सतत पुढे राहतात व  गणेशोत्सव काळातील नियोजन करून त्याचे काटेकोर पालन करीत असतात.
अतिशय शिस्तबध्द पारंपारिक व आधुनिक असा मेळ घालत सर्वोदय कला व क्रीडा मंडळाची मिरवणूक राजूर शहरातील लक्ष वेधक अशी असते.
सदर मंडळाला गणेश गभाले, शाम शिळकंदे, अल्पेश मेहता, जयराम धादवड, डॉ. राम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यावर्षी मिरवणुकीत पारंपारिक वाद्य ठेवून वसा  पुढे नेण्याचा मंडळाचा मानस असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मंडळाच्या विविध कार्यक्रमांना परिसरात दाद मिळत आहे.
तरी गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूकीत डीजेचा वापर टाळून पारंपारीक वाद्यांवर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.