Breaking News

रेल्वे रूळांवर पडणा-या मैल्याचा रेल्वेने बंदोबस्त करावा - जयदत्त होळकर

लासलगांव, २९ सप्टेंबर
 : एकीकडे शौचालये बांधण्याेंद्र व राज्य शासन देशभरातील जनतेत जनजागृती करीत असतांना रेल्वेकडून मात्र स्वच्छता अभियानाची थट्टा केली जात आहे. धावत्या रेल्वेतून अनेक गावांमध्ये रेल्वे कोचमधील शौचालयातील मैला पडत असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचेकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात होळकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे वेळी केलेल्या स्वच्छता ही आझादीपेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे. या विधानाची आठवण करून देत भारताला एक आदर्श देश बनविणेसाठी पंतप्रधान मोदी यांनी 02 ऑक्टोबर 2014 पासुन सुरू केलेल्या “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत देशभरातील जनतही घाण करणार आणि नाही करू देणार” हा मंत्र देऊन देशभर स्वच्छता करायला लावली आहे.
केंद्र शासनाच्या पावलावर पावुल ठेऊन महाराष्ट्र शासनानेही सदर अभियानांतर्गत “हागणदारी मुक्त गांव” ही संकल्पना राबविण्याचे ठरविले असुन त्यादृष्टीने राज्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांना आदेश दिलेले आहे. सदर योजनेंतर्गत लासलगांव ग्रामपंचायतही सदरची संकल्पना राबवित असून त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन प्रत्येक घरास शौचालयाची व्यवस्था असावी असा संकल्प केलेला आहे.
लासलगांव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असुन कांद्यासह इतर शेतीमालाच्या विक्रीसाठी आलेले शेतकरी आणि इतर मार्केट घटकांची लासलगांव येथे नेहमी वर्दळ असते. त्यामुळे स्थानिक जनतेपेक्षा मालविक्रीसाठी आलेल्या शेतक-यांसह कामधंद्यानिमित्त लासलगांवी मोठ्या प्रमाणावर नागरीक येतात. लासलगांव येथे रेल्वे स्टेशन असुन सदर स्टेशनवरून ये-जा करणा-या रेल्वेतून दिवसभरात लासलगांव परीसरातील रेल्वे रूळांवर रेल्वे शौचालयातील मैला पडत असल्याने परीसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होते. तसेच लासलगांव रेल्वे स्टेशनवरही शौचालयाची व्यवस्था नसल्याने लासलगांवी आलेल्या प्रवाशांची गैरसोय होते.
देशभरात रेल्वेचे मोठे जाळे असुन अनेक रेल्वे कोचमध्ये शौचालयातील मैला साठविणेसाठी व्यवस्था नसल्याने दररोज देशभरातील रेल्वे रूळांवर सदरचा मैला पडुन मोठ्या प्रमाणावर घाण निर्माण होते. सदरचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असून देशभरातील जनतेच्या आरोग्याचा विचार करता सदर प्रश्नी तातडीने लक्ष घालणे जरूरीचे आहे. शिवाय सदरच्या समस्येमुळे केंद्र शासनाच्या 'स्वच्छ भारत अभियान' व राज्य शासनाच्या “हागणदारी मुक्त गांव” या दोन्ही अभियानांचे उद्दीष्ट पूर्ण होणेस अडचण येत आहे.
त्यामुळे केंद्र शासनाने 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत देशभरात दररोज चालणा-या रेल्वे कोचमधील शौचालयातील मैल्याची तांतडीने व्यवस्था करणेबाबत तसेच देशभरातील सर्व छोट्या / मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी अद्ययावत शौचालयांची निर्मिती करणेबाबत रेल्वे प्रशासनास आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.