Breaking News

भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबत पंकजा मुंडेंची सावध भूमिका

बीड, दि. 24, सप्टेंबर - भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याबाबत गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक यांच्यात आरोप  प्रत्यारोप चालले असून पंकजा यांना गडावरील दसरा मेळाव्यास प्रवेश बंदी केली आहे. मात्र पंकजा याबाबत शांत आणि स्थिर असून त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले  नाही. उलट मेळाव्याबाबत वेळ आली की पाहू असे त्या म्हणाल्या. परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 व्या गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी आज  पंकजा मुंडे परळीत आल्या होत्या. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.