Breaking News

पाण्यात उतरून त्यांनी केले पाण्यासाठी आंदोलन

बीड, दि. 24, सप्टेंबर - आज सकाळी माजलगाव नजिकच्या अकरा पुनर्वसित गावच्या काही युवकांनी धरणाच्या खोलवर असलेल्या पाण्यात उतरून पिण्याच्या  पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले मागणी पुर्ण झाली तरच पाण्याबाहेर येवू अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे एकच गोंधळ उडाला.एकीकडे संबंधित अधिकार्यांची  धावपळ झाली तर दुसरीकडे या युवकांचे नातेवाईक हवालदिल होवून त्यांना पाण्याबाहेर येण्यास विनवू लागले होते. 
या आकरा गावांच्या लोकांच्या मुळ जमिनीवर माजलगाव धरण उभारले आहे. ही गावे दुसर्या जागी पुनर्वसित करण्यात आली आहेत या गावांना माजलगाव  नगरपरिषदेकडून पाणी देण्यात येत होते. मात्र या महिन्यात नगरपरिषदेने पाणीपुरवठा बंद केला आहे. ब्रह्मगाव, चिंचगव्हान, रेणापुरी, शेलापुरी, काडीवडगाव, नागझरी  अशी ही अकरा गावे आता पाण्यासाठी तहानलेली आहेत. शेवटी या गावचे युवक मुक्तीराम आबुज, शिवाजी आबुज, अनिल कांबळे, गोविंद चांभारे, धनंजय आबुज व  इतर जणांनी माजलगाव धरणात उतरून हे अनोखे आंदोलन केले. शेवटी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून प्रशासनाने त्यांना पाण्याबाहेर काढून पिण्याच्या पाण्याचा  प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले.