Breaking News

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी घटना दुर्दैवी : अशोक चव्हाण


मुंबर्इ, २९ : एल्फिन्स्टन आणि परळ या रेल्वे पूलावर झालेली चेंगराचेंगरीची घटना दुदैवी आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.या घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यायला हवी. सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा, असेही ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, मृतांच्या नातेवार्इकांना राज्य सरकारकडून ५ लाख व रेल्वे मंत्रालयाकडून ५ लाख अशी एकूण १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गंभीर जखमींना १ लाखांची मदत देण्यात येणार आहे आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करत असल्याचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.