Breaking News

एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृतांची नावे


मुंबई : एल्फिन्स्टन आणि परळ या रेल्वे स्थानकांना जोडणा-या पुलावर आज सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची नावे जाहीर करण्यात आली. मृतांमध्ये मुकेश मिश्रा, सचिन कदम, मयुरेश हळदणकर, अंकुश जैस्वाल, सुरेश जैस्वाल, ज्योतिबा चव्हाण, रोहित परब, अॅलेक्स कुरिया, हिलोनी देढीया, चंदन गणेश सिंह, मोहम्मद शकील, मसूद आलम, शुभलता शेट्टी, सुजाता शेट्टी, श्रद्धा वरपे, मीना वरुणकर, तेरेसा फर्नांडिस यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला. तर ३९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १४ पुरुष, तर आठ महिलांचा समावेश आहे. सुमारे ३९ जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये ३० पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे.