Breaking News

चोरही पाहताहेत सोशल मीडियावरील तुमची माहिती


सोलापूर, २९  : चोरही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरी करतात, असे सिनेमात विशेषत: हॉलीवूडच्या सिनेमात पाहिलेले असालच. इतके तंत्रशुद्ध नसले तरी त्याच्या काही प्रमाणात चोर आधुनिक सुविधांचा, माध्यमाचा वापर करत आहेत. अशांसाठी सोशल मीडियाचा वापर सहज आहे. त्यातून देवाण-घेवाण केलेल्या माहितीचा गैरवापर करून चोर चोरी करत आहेत.त्यामुळे सोशल मीडीया, फेसबुक, व्हाॅट्सअॅप यावर खासगी माहिती टाकणे शक्यतो टाळा. परगावी जातोय, सहलीला जातोय, अमूक दिवसासाठी मी या भागात राहीन. परिवारासह पर्यटनस्थळी अालोय याबाबी शेअर करताना सावध राहा. कारण ही माहिती चोरही पाहात असतील आणि अापल्या घराच्या मागावर राहू शकतील. संधी मिळाल्यास तुमचे घरही साफ करू शकतात. असे प्रकार मुंबई, पुणे, दिल्ली घडल्याचे समोर येत अाहे.चोर अशा पद्धतीनेही विचार करतात, पाहणी करतात, असे पोलिसांच्या एेकीवात येतेय. बनावट अकाऊंट, व्हाॅट्सअॅप ग्रुपवर अनोळखी व्यक्तीशी चॅटींग करणे, ग्रुपमध्ये सहभागी होणे. याचा गैरफायदा कुणी कधी घेईल सांगता येत नाही किंवा हॅक होऊ शकता. यावर एकच उपाय सावध राहणे. मुली, तरुणी, महिलांनी तर सोशल मीडियाचा वापर जरा जपून करावा.