वीज मंडळाच्या मनमानी विरोधात आ.बोंद्रे झाले आक्रमक
तोडलेल्या वीज कनेक्शनची अॅड.हरीश रावळ यांच्यानंतर आ.राहुल बोंद्रेंनी स्वत:केली जोडणी
बुलडाणा, दि. 26, सप्टेंबर - अघोषीत भारनियमना पाठोपाठ विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा कुठलीही पुर्व सुचना न देता बेकायदेशिरपणे तोडण्याचा प्रकार अंवलबीला असून चिखली तालुक्यातील जवळपास 121 पाणी पुरवठा योजनेचे विज कनेक्शन तोडल्याने सर्व तालुकाभर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण जनततेचे हाल सुरू झाले आहे.याचे परिणामी आज गावोगावचे सरपंच, ग्राप सदस्य, कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचेकडे ठिय्या देवून हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर जनतेची होणारी असुविधा व विद्युत वितरण कपंनीचा मनमानी कारभार पाहुण आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी वरील सर्वांसह उपविभागीय अभियंता विद्युत वितरण कपंनीचे कार्यालय गाठून तिथे ठिया मांडला. परंतु नेहमी प्रमाणे या कार्यालयात विद्युत वितरण कंपनीचे कुठलेही जबाबदार अभियंता गैरहजर असल्याने त्यांनी तेथूनच भ्रम्हणध्वीनी व्दारे अधिक्षक अभियंता यांचेशी संपर्क साधून सदर प्रकरणी जाब विचारला, त्यावर कार्यकारी अभियंता रामटेके यांनी आमदार राहुल बोंद्रे यांचेशी संपर्क साधून चौकशी व चर्चा केली. तेथे विद्युत वितरण कंपनीने अंदाजे बिल देवून आणी बेकायदेशीररित्या विद्युत कनेक्शन तोडून जो प्रकार केला, त्याबध्दल ग्रामपंचायतची माफी मागावी व तोडलेले वीज कनेक्शन जोडून देण्यात यावे अशी आग्रही मागणी आ.बोंद्रेंनी यावेळी केली.
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे, दसरा दिवाळी जवळ आली आहे, अशा सणासुदीच्या तोंडावर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार विज वितरण कंपनीने केला आहे. ग्रामपंचायतीने विजेचे बिल भरले नाही असे कारण जरी यामागे असले तरी, त्यासाठी कुठलीही पुर्व सुचना न देता ग्रामपंचायतची वसुली नसतांना ग्रामपंचायतीचे आचारसहीता लागेल्या असतांना, आणी ग्रामपंचायतकडे कर भरणा करणार्या शेतकर्यांचे खरीप हंगाम सुरू असुन त्यांचेकडे भरण्यासाठी पैसा उपलब्ध नसतांना हा प्र्रकार झालेला आहे. विशेष म्हणजे जी 121 कनेक्शन तोंडण्यात आली, त्यापेैकी 90 टक्केपेक्षा अधिक कनेक्शनला विज मिटर नसतांनाही, कुठलेही रिडींग नसतांनाही, अंदाजे मागिल कार्यकाळाची बिले आकारण्यात आलेली आहेत. त्यावर दंड आणी व्याजही लावण्यात आलेला आहे. या मनमानी प्रकारामुळे ग्रामपंचायतींना बिल भरणे सध्या शक्य नसल्याने मुळ विजबिल हिशोबासह देण्यात यावे, रेडींग नसतांना अंदाजे बिल आकारले गेले आहे ते योग्य करण्यात यावे, विज बिलाचा हिशोब ग्रामपंचायतींना देण्यात यावा, दंड व व्याज माफ करण्यात यावे, नगर परिषदेला ज्या पध्दतीने 14 व्या वित्त आयोगातील पैसा या कामी वापरता येतो तसाच ग्रामपंचायतींनाही अधिकार देण्यात यावा, दरमहा रेडींग घेवूनच नियमीत बिल देण्यात यावे, व हिशोबाअंती सध्याचे थकीत बिलाचे योग्य ते हप्ते पाडून देण्यात यावे, या मागण्यांबरोबरच खंडीत केलेला विज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा व यापूढे पुर्व सुचना न देता विज पुरवठा खंडीत करू नये अशी मागणी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या नेतृत्वात एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यावेळी चिखली तालुका कॉग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष कैलास खंदारे, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, युवक कॉगे्रसचे अध्यक्ष रमेश सुरडकर, अशोकरराव पडघान, उपसभापती ज्ञानेश्वर सुरूशे, समाधान सुपेकर, लक्ष्मण आंभोरे, ईश्वर इंगळे, शिवनारायण म्हस्के, भारत म्हस्के, जिवन देशमुख, प्रमोद पाटील, सत्तार पटेल, रविअण्णा काळे, प्रताप कुटे, पुरूषोत्त शेळके, बद्री पाटील, ज्ञानेश्वर भुसारी, दिनक डोंगरदिवे,प्रमोद महाले, बाळु साळोख, रामदास रसाळ, अर्जुन गवई,संजय गिरी, ज्ञानेश्वर सोळंकी, भास्कर धमक, रमेश पाटील, भास्कर काकडे, निलांजी सवडे या कायकर्त्यांसह विद्युत कनेक्शन कट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या स्वाक्षर्या निवेदनावर आहे.
वीज कनेक्शनवर मिटरचा पत्ता नाही, त्यामुळे रिडींगचा विषय नाही, तरी मन मानेल त्या प्रमाणे आकडे टाकुण पाणी पुरवठा योजनेचे विज बिल देण्याचा प्रकार, त्यात आकारलेल्या बिलातही दंड त्यावर व्याज, असे अनियमीत बिल ग्रामपंचायतला दयायचे, कुठलीही पुर्व सुचना न देता ग्रामीण भागातील गावकर्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे गंभिर होणार व पाणी पुरवठा योजना कोलमडून पडणार हे माहीत असतांनाही बेकायदेशीरपणे पाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन खंडीत करण्याचा प्रकार, मनमानी कारभार करणार्या अधिकार्यांनी करून संपुर्ण तालुका वेठीस धरला आहे. ही विज जोडणी कॉगे्रस कार्यकर्त्यांनी गावकर्यासह करून आणी पुरवठा सुरळीत केला आहे. जर विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी परत हा सुरू केलेला विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्न केला, तर गावकरी त्या कर्मचार्यास गावा बाहेर जावू देणार नाहीत व डांबुन धरतील असा ईशाराही यावेळी कॉगे्रसच्या वतीने देण्यात आला असून यामुळे अनेक वाद प्रसंग उद्भवन्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वत: खांबावर चढून वीजपुरवठा सुरू केला!
या आंदोलनात सहभागी कॉगे्रस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या महावितरण कंपनी विरोधातील सतंप्त भावनामुळे भावनामुळे या प्रसंगी वातावरण तप्त झालेले होते. महावितरण कपंनीचे कुठलेही अधिकारी हजर नाही, विज बिला बध्दल स्पष्टपणे खुलासा कुणाही उपस्थित कर्मचार्याकडून होत नाही, त्यामुळे विज जोडणी होईल काय याचे उत्तर मिळत नसल्याने आमदारांनीही आक्रमक स्वरूप धारण करीत तालुक्यातील हातणी या गावातील गावकर्यांना व या पदाधिकार्यांना सोबत घेवून त्या गावातील पाणी पुरवठा योजनेचा खंडीत केलेला विज पुरवठा स्वत: खांबावर चढुण जोडून देण्याचा प्रकार केला. याच पध्दतीने विज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या गावातील नागरीकांनी व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी स्वत: जोडून घ्यावा त्याचे परीणामी होणार्या खटल्याची पर्वा करू नये. या बेकायदेशीर विज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकारात आपण सर्वतोपरी गावकर्यांच्या सोबत असून त्यांना सहाय्य करणार असल्याचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी सांगितले.
