Breaking News

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा : खा. रावसाहेब दानवे

बुलडाणा, दि. 03, सप्टेंबर - केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्त्वकांक्षी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ जनसामान्यांपयर्ंत पोहोचवून त्यांचे जीवनमान  सुधारण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी केले.
खामगाव विधानसभा मतदार संघाचा भाजपा कार्यकर्ता मेळावा देशमुख मंगल कार्यालयात 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पार पडला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  मंचावर खामगाव मतदार संघाचे युवा आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, राज्य परिषद सदस्य  पाटील, जि. प. समाज कल्याण  सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, पं. स. सभापती उर्मिला गायकी, नगराध्यक्षा अनिता डवरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष  सचिन देशमुख, जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा, संतोष देशमुख, चंद्रशेखर पुरोहित, डॉ. मांटे, अनु. जाती आघाडी अध्यक्ष भालेराव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी  खा. रावसाहेब दानवे यांनी  खामगाव मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपा सरकार जनसामान्यांचा विकास  व्हावा, यासाठी प्रामाणिकपणे कार्य करीत आहे. जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. प्रत्येकाला या योजनांचा लाभ मिळावा यासाठी  कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे. 2019 च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, प्रत्येक  आतापासुनच कामाला लागा. असे निर्देशही त्यांनी  पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
तसेच प्रत्येक शेतकर्‍याला कर्जमाफी मिळावी यासाठी कार्यकत्यार्ंनी शेतकर्‍यांना सर्वोेतोपरी मदत करावी, असे  आवाहन  कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केले. ना. फुंडकर पुढे म्हणाले की, आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी राज्य सरकारने दिली आहे. चोरांना लाभ मिळू नये  तसेच खर्या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठीच ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. साधी - सरळ प्रक्रिया असून शेतकर्‍यांनी गोंधळात पडू नये, मंडळस्तरावरही   सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज भरुन कर्जमाफी घ्यावी. राज्यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे.  त्यामुळे भाजपा पदाधिकारी व प्रत्येक कार्यकत्यांनी शेतकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात खामगाव मतदार संघातील विकास कामांचा तसेच पक्ष संघटनेचा आढावा आ. अ‍ॅड. आकाश  फुंडकर यांनी प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांचेसमोर  मांडला.  खामगावात प्रथम आगमनानिमित्त खा. रावसाहेब दानवे यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. या मेळाव्याचे संचालन अ‍ॅड. बाबू भट्टड तर आभार  प्रदर्शन जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.