Breaking News

शिकस्त शाळांच्या प्रस्तावास मंजुरी द्या!

बुलडाणा, दि. 03, सप्टेंबर - ग्रामीण विद्यार्थी हा गुणात्मक पातळीवर शहरी विद्यार्थ्यांपेक्षा पुढे आहे. परंतु पायाभूत सुविधांचा अभाव  शैक्षणिक विकासात अडसर  ठरत आहे. जिल्ह्यातील शिकस्त शाळा, खोल्यांची आजची परिस्थिती ही विद्यार्थ्यांच्या जीवन मरणाशी खेळणारी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटनेचा विचार  करता, जिल्हा परिषदेकडे प्रलंबित शिकस्त शाळांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा  प्रमुख जालिंदर बुधवत यांनी गुरुवारी दिला आहे.  दिलेल्या निवेदनात त्यांनी नमुद केले की, दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे  छत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू 14 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शेकडो शिकस्त शाळांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. शाळा  समिती, ग्रामसभेचा ठराव, पंचायत समिती आणी तेथून जिल्हा परिषद बांधकाम असा  या प्रलंबित प्रकरणांना वेळकाढू धोरणाची साथ देत आहे. तालुक्यातील मढ,  इजलापूर, मासरुळ, वरुड, तराडखेड, गुम्मी जामठी या गावांसह जिल्ह्यातील अनेक शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेत धूळखात पडले आहेत. त्यामुळे शिकस्त  झालेल्या शाळांचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करावे, अन्यथा शिवसेना स्टाईनले आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना जिल्हा   जालिंदर बुधवत, संजय गायकवाड, अशोक इंगळे, किसान सेनेचे लखन गाडेकर, विजय जायभाये, आशिष जाधव, दीपक सोनुने, माणिकराव सावळे, राजू मुळे,  विजय इतवारे, अशोक गव्हाणे, गोपाल डिके, नंदू देशमुख, समाधान बुधवत, रवींद्र गोरे, रेश गवते, नीलेश राठोड, बाळाभाऊ नारखेडे, निखील नारखेडे, गौरव  तायडे, भीमराव आडवे, दीपक तुपकर, सचिन परांडे, विजय  गोटू यरमुले, गोकुळ साखरे, गिरीष आडेकर गजानन भिंगारे उपस्थित होते.