संगमनेरच्या थोरात साखर कारखान्याला राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कार जाहीर
अहमदनगर, दि. 04, सप्टेंबर - देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय कार्यक्षमतेचा सर्वाधिक साखर निर्यातीचा द्वितीय पुरस्कार जाहिर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण 25 सप्टेंबर 2017 (सोमवार)रोजी दिल्ली येथे होणार असून यावेळी थोरात कारखान्याला स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने दरवर्षी साखर उद्योगात उल्लेखनिय कार्य करणार्या साखर कारखान्यांना या पुरस्काराने गौरविले जाते.राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम उच्चांकी गाळप करत सर्वाधिक भाव दिला आहे.संगमनेर तालुका हा कमी पाऊस असलेला तालुका असून ही या कारखान्याने सातत्याने सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास संपादन केला असून सतत ऊस विकाससासाठी नवनवीन उपक्रम राबविले आहे.या कारखान्याने 5500 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कारखाना अगदी कमी कालावधीत कार्यान्वीत केला आहे.याच बरोबर 30 मेगावॅट वीज निमिर्ती प्रकल्प ही सुरु केला आहे.सभासद व ऊस उत्पादकांबरोबर कामगारांचे हीत जोपासत कार्यक्षेत्रात विविध सिमेंट बंधारे,चारी दुरुस्ती,रस्ते,पुल अशी समाज हिताची कामे केली आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आर्थिक शिस्त,नियोजन व दुरदृष्टी ठेवून गुणवत्तापुर्वक राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या कारखान्याला आत्तापर्यंत राय व देशपातळीवर अनेकवेळा गौरविले गेले आहे.सहकाराची पंढरी ठरलेल्या संगमनेर च्या शिरपेचात कारखान्याला मिळालेल्या या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला आहे. सततच्या या गौरवास्पद वाटचालीत आ.बाळासाहेब थोरात,कारखान्याचे अध्यक्ष अॅड.माधवराव कानवडे,उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे,सर्व संचालक व कार्यकारी संचालक जे.बी.घुगरकर यांचा ही मोठे योगदान राहिले आहे.कारखान्याच्या या यशाबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे,रणजितसिंह देशमुख,सत्यजीत तांबे,शिवाजीराव थोरात,अमित पंडीत,शंकर खेमनर पाटील,निशा कोकणे,बाबा ओहळ,रामदास वाघ,अजय फटांगरे,विश्वास मुर्तडक,बाळकृष्ण दातीर,राजेंद्र कडलग,राजेंद्र गुंजाळ,आदींसह सभासद,ऊस उत्पादक व नागरीकांनी आभिनंदन केले आहे.