ऐतिहासिक, धार्मिक देखाव्यांबरोबरच सामाजिक विषयांच्या देखाव्यांनाही पसंती
अहमदनगर, दि. 04, सप्टेंबर - गणेशोत्सवाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस सुरू असल्याने सार्वजनिक गणेश मंडलांना देखाव्यांची कामे पूर्ण करण्यास थोडा उशीर झाला.मात्र 30 ऑगस्ट पासून पाऊस थांबल्यानंतर मंडळांनी देखाव्यांची कामे वेगाने पूर्ण केली असून शनिवारपासून देखावे पाहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागल्याचे दिसत आहे.गणेशोत्सवाचे अखेरचे दोन दिवस भाविकांची मोठी गर्दा होणार असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
अहमदनगर मधील सार्वजनिक गणेश मंडळांनी सातत्याने ऐतिहासिक व धार्मिक देखावे सादर करण्याची आपली परंपरा काय.म ठेवली आहे.मात्र काही मंडळांनी सामाजिक विषयांचे देखावे देखील सादर केले आहेत.देखावे पाहाण्यासाठी शनिवार पासून नागरिक घराबाहेर पडले आहेत.त्यामुळे सायंकाळ पासून शहरातील बहुतेक सर्व रस्ते अक्षरश: गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे.विशेषत: हलत्या मूर्ती असलेल्या देखाव्यांना नागरिक मोठा प्रतिसाद देतांना दिसत आहेत.माळीवाडा तरूण मंडळाने महिलांची दहिहंडी हा देखावा सादर केला आहे.महालक्ष्मी मंडळाने सती अनुसया व कपिलेश्वर मंडळाने देखील भव्य दिव्य देखावा सादर केला आहे.नेप्ती नाका परिसरातील नवग्रह मित्रमंडळाने शिवरायांची रणनिती हा देखावा तयार केला आहे.चिळक रस्त्यावरील लोकमान्य मित्रमंडळाने नागपाशातून श्रीराम-लक्ष्मणाची सुटका हा देखावा सादर केला आहे.पे्ररणा प्रतिष्ठान मंडळाने श्री बालाजी मंदिर साकारले आहे.त्याबरोबरच शहरातील काही मंडळांनी सामाजिक विषयांवरील देखावे सादर केले आहेत.चौपाटी कारंजा मित्रमंडळाने स्वच्छतेचा दूत-वासुदेव हा देखावा केला आहे.तसेच अनेक मंडळांनी गणेशोत्सवा निमित्त रक्तदान शिबिरे,नेत्रतपासणी शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम देखील हाती घेतले असून नागरिकांकडून या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.