Breaking News

गोंदियात आय लव्ह यू पाकिस्तान लिहिलेले फुगे; युवा सेनेने फुगे पोलिसांना सोपवले

नागपूर, दि. 28, सप्टेंबर - विदर्भातील गोंदिया शहरात ’आय लव्ह यू पाकिस्तान’ लिहिलेले फुगे संतापयुक्त चर्चेचा विषय ठरलेत. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे फुगे  जप्त करून पोलिसांकडे सोपवलेत.
गोंडीयातील गांधीनगरचे ठाणेदार मनोहर दाभाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया येथील फुगा व्यापारी रामचंद्र बेलानी यांनी मुंबईच्या मिरची बाजार येथून फुग्यांचे  पॅकेट 25 दिवसापूर्वी गोंदियात आणलेत. त्यांनी फुग्यांचे 50 पॅकेट आणले होते. त्यातील 40 पॉकेट त्याने रजतकुमार छोतलानी याला विकले. तर छोतलानी याने  दौलत मेघांनी याला विकले. मेघांनी याने नवरात्रोत्सवात फुगे विकले. यातील आय लव्ह यू पाकिस्तान असे लिहिलेला एक फुगा एका मुलाकडे असल्याचे युवा सेना  कारकर्त्यांना आढळून आले. गांधी चौक परिसरातून त्यांनी तो फुगा जप्त करून शहर पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर पोलिसांनी आणखी चौकशी करीत  व्यापार्‍यांना आज, बुधवारी पोलिस ठाण्यात बोलावले. जबाब नोंदवून सोडून दिले. मुंबईच्या मिरची बाजारातून फुगे आणल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. त्या दिशेने  तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.