Breaking News

अहमदनगरमध्ये राष्ट्रपतींच्या दौ-यासाठी प्रचंड बंदोबस्त तैनात

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - 1 ऑक्टोबर रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा महत्वाचा दौरा,संपूर्ण जिल्हाभर सादरा होणारा विजयादशमीचा उत्सव,  1 ऑक्टोबर रोजीच नगरमध्ये मोहरम सवारीची मिरवणुक,त्याच्या अगोदरच्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी कत्तलची रात्र मिरवणुक व अशा धामधुमीच्या काळातच  भगवान गडावरील संभाव्य दसरा मेळावा होणार की नाही या वरून निर्माण झालेला तणाव यामुळे पोलीसांची मोठी कसरत होणार आहे.मात्र तरीदेखील सर्व गोष्टींचा  विचार करून पोलीसांनी प्रचंड बंदोबस्ताचे नियोजन केले् आहे.या कालावधीत नगर जिल्ह्यात बाहेरून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पाचारण करण्यात येणार  असून सुमारे अडीच हजार पोलीस यावेळी बंदोबस्ताचे काम करणार आहेत.
30 सप्टेंबर रोजी दसरा उत्सव जागोजागी साजरा केला जाणार आहे.त्यानिमित्ताने गावोगावी सीमोलंघनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच त्याच दिवशी  रात्रीच्या वेळी नगर शहरात कत्तलची रात्र मिरवणुकी देखील काढली जाणार आहे.दुसर्या दिवशी सकाळपासून मोहरम सवारी मिरवणुकीचे नियोजन आहे.तर 1  ऑक्चोबर ला शिर्डी मध्ये महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थिती मध्ये साईबाबा समाधी शताब्दी सोहळा शुभारंभ व शिर्डी येथील काकडी विमानतळाचे  लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाणार आहे.नगर मधील परिस्थतीचा विचार केला तर बंदोबस्तासाठी पोलीसांना 30 सप्टेंबर च्या सकाळपासून ते 1 ऑक्टोबर च्या  रात्री मोहरम ची मिरवणुक संपेपर्यंत सलगपणे बंदोबस्ताचे काम करावे लागणार आहे.त्याच दरम्यान विजयादशमीच्या दिवशी श्रीक्षेत्र भगवान गडावर दसरा मेळावा  घेण्यासाठी आक्रमक झालेले ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक व दसरा मेळावा गडावर होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील असेलले विरोधक यांच्यातील  संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे.त्यामुळे भगवान गडावरील बंदोबस्ताचे देखील काटेकोर नियोजन पोलीस दलाला करावे लागणार आहे.एकूणच या  सर्व घडामोडींच्या पाश्वभूमीवर पोलीस दलाची सत्वपरीक्षा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.भगवानगडावरील संभाव्य मेळावा,मोहरम,कत्तलची रात्र,राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांचा दौरा असे कार्यक्रम लक्षात घेतले तर जिल्ह्यात या कालावधीत कोठोही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याकरिता पोलीसांनी प्रचंड  मोठा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे.जिल्हा पलीस दलाच्या बरोबरीने बाहेरच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी नगरमध्ये  बोलावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.बंदोबस्तासाठी पोलीस अधिक्षक दर्जाचे 8 अधिकारी,22 उप अधिक्षक,57 पोलीस निरीक्षक,124 सहाय्यक निरीक्षक व  उपनिरीक्षक,1 हजार 355 पोलीस कर्मचारी,शीघ्र कृती दलाचे पथक,वरूण ही सुसज्ज 2 वाहने,सुरक्षा विबागाचे कर्मचारी,साडेचारशे महिला व पुरूष कर्मचारी असा  मोठा बंदोबस्त नियुक्त केला जाणार आहे.