Breaking News

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली

मुंबई, दि. 21, सप्टेंबर - मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्‍न मिटला  आहे.
मोडक सागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या 128.93 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. तर, तानसा  धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. सध्या तानसा धरणात 144.59 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भातसा धरण क्षेत्रातही पावसाने  दमदार हजेरी लावल्याने 929.77 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.
ठाणे आणि कल्याणला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणही पूर्ण भरले आहे. मुंबई लगतच्या वसई, विरार, मिरारोड आणि भाईंदरला पाणीपुरवठा करणारे धामणी  धरणदेखील 100 टक्के भरले आहे.