पावसामुळे विमानतळावरील मुख्य धावपट्टी बंद, 50 हून अधिक उड्डाणे रद्द
मुंबई, दि. 21, सप्टेंबर - मंगळवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी संध्याकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र धावपट्टी क्रमांक 14 आणि धावपट्टी क्रमांक 32 वरुन विमानांची उड्डाण सुरु ठेवण्यात आली आहेत. काल संध्याकाळपासून एकूण 56 विमानांचा मार्ग बदलण्यात आला . तर 50 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
बाहेरुन येणार्या अनेक विमानांच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले असून ती इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. दरम्यान , काल रात्री स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरुन घसरले. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही. देशातंर्गत विमान सेवा पुरवणार्या कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याची तयारी दर्शविली आहे.