Breaking News

मुंबई - कसारा उपनगरी रेल्वे सेवा अखेर पाच दिवसांनंतर सुरू

मुंबई, दि. 02, सप्टेंबर - आसनगाव- वासिंद रेल्वे स्थानका दरम्यान दुरांतो एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर ठप्प झालेली कसा-याच्या दिशेने जाणारी  रेल्वे सेवा आज पाच दिवसांनंतर सुरू करण्यात आली आहे. सकाळीच्या 8.30च्या दरम्यान पहिली कसारा गाडी वाशिंद येथे पोहोचली, अशी माहिती मध्य रेल्वेचे  मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. सध्या वेळापत्रकानुसार गाड्या सोडल्या जात नसून केवळ विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, पारी 2  वाजेपर्यंत कसारा मार्ग पूर्णपणे पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.
29 ऑगस्ट रोजी दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे रेल्वे रूळावरून घसरले होते. त्यामुळे कसार्‍याकडे जाणारी वाहतूक गेले चार पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली  होती. याचा परिणाम लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला होता. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर, काही गाड्यांचे मार्ग  बदलण्यात आले होते. उपनगरी सेवा बंद असल्याने काही लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती.