Breaking News

गोवा बनावटीची चोरटी दारू तळेरे येथे जप्त

सावंतवाडी, दि. 30, सप्टेंबर -  गोवा बनावटीची चोरटी दारू आज तळेरे (ता. कणकवली) येथे उत्पादनशुल्क विभागाने जप्त केली. आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी  यांच्या आदेशानुसार विभागीय उपआयुक्त श्रीमती संगीता दरेकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या विशेष विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली.
मुंबई-गोवा महामार्गावर तळेरे येथे गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करताना मारुती व्हॅन (क्र. एमएच 03 के 3522) पकडण्यात आली. या प्रकरणी फरारी  आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वाहन व तपासामध्ये विविध बनावटी ब्रँडचे गोव्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे 50 बॉक्स सापडले.  वाहनासह एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत 3 लाख 98 हजार 400 रुपये इतकी आहे. या कारवाईत विशेष भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक संजय वाडेकर आणि  त्यांचे सहकारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुय्यम निरीक्षक अमित पडाळकर, आणि अन्य सहकारी सहभागी झाले होते.