अवैध वाळू तस्करीप्रकरणी सहा कोटीचा दंड वसूल
सांगली, दि. 21, सप्टेंबर - अवैध वाळू उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी गत दीड वर्षात सांगली जिल्हा प्रशासनाने वाळू तस्करांना 25 कोटी रूपयांचा दंड केला आहे. त्यातील सहा कोटी 14 लाख 37 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. वाळू तस्करांची संघटित गुन्हेगारी मोडून काढणार असून काही बड्या वाळू तस्करांना तुरूंगात डांबल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी दिला.
सांगली जिल्हा प्रशासनाने वाळू तस्करीविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. आजपर्यंत 73 वाळू साठ्यांवर छापा टाकण्यात आला असून 45 वाहने ताब्यात घेतली आहेत. संबंधितांकडून सात हजार 107 ब्रास वाळू जप्त केली असून या वाळू तस्करांना 25 कोटी 48 लाख रूपये दंडाच्या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यातील सहा कोटी 14 लाख 37 हजार रूपये दंडाची वसुली करण्यात आलेली आहे. या सर्व जप्त वाळूचा लवकरच लिलाव काढण्यात येणार आहे. ज्यांना वाळूची गरज आहे, त्यांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन ही वाळू खरेदी करावी, असे आवाहनही विजयकुमार काळम- पाटील यांनी केले.
वाळू तस्करांनी दिलेल्या वेळेत हा दंड न भरल्यास संबंधितांच्या स्थावर मिळकतीवर बोजा चढविण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ दंडात्मक कारवाई करून संबंधितास सोडून देण्यात येत होते. मात्र यापुढील कालावधीत वाळू तस्करांना जरब असेल अशी कारवाई केली जाणार आहे. वाळू तस्करांवर कारवाई करण्यात कवठेमहांकाळ तालुका प्रशासन आघाडीवर आहे.
कवठेमहांकाळ तालुका प्रशासनाने 45 कारवाईत 53 लाख 85 हजार रूपये, मिरजने 21 कारवाईत 15 लाख 92 हजार, तासगावने 41 कारवाईत 23 लाख 89 हजार, जतने 52 कारवाईत 47 लाख 97 हजार, खानापूरने 21 कारवाईत नऊ लाख 58 हजार, कडेगावने 33 कारवाईत नऊ लाख 20 हजार, आटपाडीने 36 कारवाईत 12 लाख 63 हजार, पलूसने 13 कारवाईत 12 लाख 81 हजार, वाळवाने चार कारवाईत दोन लाख 43 हजार, तर शिराळा तालुका प्रशासनाने दहा कारवाईत दोन लाख 56 हजार रूपये इतका दंड वाळू तस्करांकडून वसूल केला असल्याचे विजयकुमार काळम- पाटील यांनी सांगितले.