डॉ. आमटे यांना धन्वंतरी पुरस्कार
सोलापूर, दि. 21, सप्टेंबर - येथील वसंतराव बाबूराव गरड यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा यंदाचा धन्वंतरी पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला आहे. 27 सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे सचिव शैलेश गरड यांनी पत्रकार परिषदेत दिली. कै. संभाजीराव गरड बहुउददेशीय संस्थेतर्फे चार वर्षांपासून वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धन्वंतरी पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ आमटे हे हेमलकसा (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे आदिवासी लोकांच्या शिक्षण, आरोग्यासाठी लोकबिरादरी प्रकल्प चालवतात. तसेच जखमी वन्य प्राण्यांवरही उपचार करतात. 27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयाजवळील घाटुळे मंगल कार्यालयात पुसोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांचे हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थानी बाबासाहेब क्षीरसागर असतील.