Breaking News

राज्यातील शाळांसाठी केआरएची पद्धत लागू

मुंबई, दि. 26, सप्टेंबर - शाळांसाठी केआरएची पद्धत लागू करण्यात आली आहे. शालेय स्तरावरही दर्जा सुधारण्यासाठी आता शाळांनाही केआरए पद्धत सुरू  करण्यात येत असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढकार घेतला आहे. केआरएची अंमलबजावणी करून राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा देशात पहिल्या तीन  राज्यांमध्ये आणणे आणि वाढत्या गळतीला आळा घालणे ही दोन या नव्या निर्णयामागची उदिष्ट आहेत. शालेय स्तरावर अधिकार्‍यांनी या पद्धतीसाठी काटेकोर  अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.