Breaking News

मध्य रेल्वेच्या 74 स्थानकांवर सरकते जिने !

मुंबई, दि. 26, सप्टेंबर - मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर 74 सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत,  कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वेप्रमाणेच मुंबई रेल्वे विकास महामंडळ कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहकार्याने काही स्थानकांवर सरकते जिने बसविले जातील. स्थानकात एकापाठोपाठ लोकल  आल्यानंतर सरकते जिने असलेल्या ठिकाणी प्रवाशांची कोंडी होत नाही. ही संकल्पना प्रवाशांना पसंत पडली आहे. पश्‍चिम, मध्य रेल्वे आणि हार्बरवर काही  स्थानकांत सरकते जिने असून त्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.