Breaking News

पतंजली आयुर्वेद प्रकल्पात स्थानिकांना डावलले!

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - तालुक्यातील खडका फाटा येथे सुरु होत असलेल्या पतंजली आयुर्वेद प्रकल्पामधे कार्यकारी संचालक चौहान यांची मनमानी सुरु आहे. नोकरभरतीत स्थानिकांना डावलले जात आहे. याप्रकरणी पतंजलि प्रशासनाने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा अन्यायग्रस्त स्थानिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भा.ज.प. नेते अनिल ताके यांनी दिला. 
वते म्हणाले, र्षभरापूर्वी नेवासा तालुक्यातील औरंगाबाद मार्गावर खडका फाट्यावर पतंजली प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पतंजलीचे सर्वेसर्वा स्वामी रामदेव बाबा यांचे उपस्थितीत झाली होती. त्यावेळी रामदेवबाबा यांनी या प्रकल्पात स्थानिकांना भरती करून या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करवून देवू, असे सांगितले होते. मात्र असे असतांना या प्रकल्पाचे कार्यकारी संचालक चौहान हे मनमानी कारभार करत असून त्यांनी नोकरभरतीत स्थानिकांना डावलून बाहेरील उमेदवार भरती केले आहेत. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या नाराजीचा परिणाम भविष्यात पतंजलिला त्रासदायक ठरणार असून याला जबाबदार केवळ कार्यकारी संचालक चौहान हेच राहतील, असेही ताके यांनी स्पष्ट केले.