Breaking News

बनावट जात प्रमाणपत्र सादर करून प्राचार्य झालेल्याच्या विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद, दि. 28, सप्टेंबर - बनावट जात प्रमाणपत्र सादर करून प्राचार्यपदी राहून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉ.  मकदुम मोईयोद्दीन फारुकी यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून या मुळे आज संस्थेत खळबळ उडाली होती.
डॉ. शेख सलीम शेख चाँद (रा.मौलाना आझाद हौसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.डॉ. मकदुम फारुकी खुल्या  प्रवर्गातील असूनही त्यांनी बेलदार(डीएनटी)जातीचे प्रमाणपत्र सादर करुन प्राचार्यपद मिळविले आहे. ते 1993पासून मौलाना आझाद कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर  कार्यरत असून त्यांनी प्राचार्य पदाच्या सर्व सवलती आणि वेतन घेऊन संस्थेची व शासनाची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.ही तक्रार सीटी चौक पोलिस  ठाण्यात देण्यात आली आहे.