Breaking News

महिला कुस्तिपटूची हिंगोलीत दंगल

हिंगोली, दि. 28, सप्टेंबर - हिंगोलीत आज एका महिला कुस्तीपटुने एका पुरूष कुस्तीपटुला अवाहन देवून अक्षरशहा चितपट केले. दंगल चित्रपटाची आठवण व्हावी  असे हे दृष्य होते.हिंगोली जिल्हयातील वसमत तालुक्यात दरवर्षी तालुक्याच्या ठिकाणी दसरा कमिटीच्या वतीने कुस्ती स्पर्धा घेण्यात येते.या स्पर्धेत गावोगावचे पुरूष  स्पर्धक भाग घेतात मात्र पहिल्यांदाच या स्पर्धेत महिमा राठोड या (वय18) वर्षीय मुलीने सहभाग घेतला आणि अनेक स्पर्धा जिंकलेल्या चंद्रभान वाणी (वय19 )या  पहिलवान मुलास डाव टाकत चितपट केले.तिच्या उत्तम खेळीचे सगळेजण कौतुक करत होते.