Breaking News

कोठल्यात दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर, दि. 13, सप्टेंबर -  गाडीस चेंडू लागल्यास राग येऊन गाडीचालकाने जमाव जमवून दोघांना लोखंडी गज, दांडक्याने जबर मारहाण करून जीवे  मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कोठला येथील बाराइमाम मस्जिदसमोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी सय्यद इलिहास, सय्यद आवेज, सय्यद परवेझ, मनीज  सय्यद, सय्यद मोहसिन, सय्यद महनवाज, शेख मज्जु (सर्व रा. बाराइमाम कोठला) यांच्याविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
कोठला येथील बारा इमाम मस्जिदसमोर लहान मुले चेंडू खेळत होती. त्यावेळी जवळून जाणार्‍या सय्यद इलिहास याच्या गाडीला चेंडू लागला. त्याचा राग येवून  इलिहास याने सदर मुलाला शिवीगाळ केली. त्यावेळी शेख इकबाल अतीफ यांनी मुलाला शिवीगाळ का करतो असे विचारले असता त्याचा राग येवुन त्याने फिर्यादीस  जिवे मारण्याची धमकी देऊन लोखंडी रॅडने मारहाण करण्यास सुरवात केली. त्या दरम्यान फिर्यादीचा भाचा हा सोडविण्यास आला असता आरोपींनी जमाव जमवुन  फिर्यादीच्या भाच्यास हातातील लोखंडी गज लोखंडी रॉड, लाकडी दांडगके, धारदार शस्त्र यानी मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तोफखाना  पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई  सोनी हे करत आहे.
नालेगावातील सात जणांवर
खंडणीसह चोरीचा गुन्हा
शहरातील चौपाटी कारंजा चौकात नाष्ट्याची हातगाडी लावण्यासाठी दररोज पाचशे रूपये हप्ता देण्यास नकार दिल्याने हातगाडी चालक व त्याच्या मुलास सात  जणांनी तलवार व लोखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच गल्ल्यातील 6 हजाराची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी अतुल वाघचौरे, भैय्या  रोहकले, धीरज रोहकले व इतर 3 ते 4 चार जण (सर्व रा. नालेगाव) यांच्याविरूध्द खंडणी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी  गणेश राजेंद्र भागानगरे  (वय 27 रा. लक्ष्मीकारंजा) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 पर्स चोरट्याने पळविली
 रेल्वे स्टेशनजवळील लोखंडी पुलावरून पायी जाणार्‍या महिलेची पर्स मोटारसायकलवरील चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. पर्समध्ये 5 हजाराची रक्कम, पॅनकार्ड,  आधारकार्ड व मोबाईल होेता. सुनीता विनोद शर्मा (वय 40 रा. अंबर गज, उत्तरप्रदेश) या शहरातील रूग्णालयाकडे औषधोपचाराकरीता पायी येत असताना लोखंडी  पुलावर पाठीमागून जोरात आलेल्या दोघांनी शर्मा यांच्या हातातील पर्स घेऊन पोबाारा केला. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.