Breaking News

मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत?

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद येण्याची चिन्हं आहेत. मंत्रिमंडळ विस्तार 2 किंवा 3 सप्टेंबरला होण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच अनेक मंत्र्यांनी  स्वत:हून राजीनामे सादर केले आहेत.
केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, उमा भारती यांनीदेखील आरोग्याचं कारण पुढे करत आपला  राजीनामा सादर केला आहे. मात्र, असं असलं तरी बाबरी मशीद प्रकरणात नाव आल्यानं उमा भारती यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे. उमा भारती  यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय  घेण्यात आलेला नाही.