Breaking News

रेल्वेत दिव्यांग खेळाडूला पुन्हा एकदा ‘वरचा बर्थ’

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - आशियाई पॅरा थेलॅटिक्स स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेली दिव्यांग खेळाडू सुवर्णा राज हिला रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे  प्रवासात वरचा बर्थ देण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. अशाच प्रकारची घटना जून महिन्यातही घडली होती. सुवर्णा राज हिने नागपूर ते दिल्ली या प्रवासासाठी  रेल्वेचे तिकिट दिव्यांगांच्या राखीव कोट्यातून आरक्षित केले होते. शुक्रवारी (1 सप्टेंबर) जेव्हा ती रेल्वेत चढली, त्यावेळी तिला वरचा बर्थ मिळाल्याचे लक्षात आले.  या संदर्भात तिने तिकिट तपासनीसाकडे धाव घेतली. मात्र तेथूनही अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.
‘अशाच प्रकारची घटना जून महिन्यात घडली होती. पण त्यानंतरही पुन्हा तसेच घडणे हे अयोग्य आहे. या बद्दल मी तिकिट तपासनीस यांच्याही मदत मागितली, पण  त्यांनी मला कोणतीही मदत केली नाही, असे सुवर्णाने सांगितले.