Breaking News

एफिड्रीन अंमली पदार्थ तस्करीचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

सोलापूर, दि. 02, सप्टेंबर - एफिड्रीन अंमली पदार्थाच्या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातही असल्याचे उघड झाले आहे. विकी गोस्वामी याचा पाकिस्तानी मित्र  मोहमद आसिफ हाफिज हक्का सुलतान याला लंडन पोलिसांनी नुकतेच अटक केल्यानंतर हे उघड झाले.हाफिज हा ब्रिटनमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करत होता.  हाफिजचे गोस्वामी याच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तस्करी प्रकरणात हाफिजचा मोठ्या काळापासून शोध सुरू होता, तो आता लंडन पोलिसांच्या हाती  लागला आहे.सोलापूरमध्ये जप्त केलेले एफिड्रीन दक्षिण अफ्रिकेला पाठविण्यात येणार होते. दक्षिण अफ्रिकेमध्ये हाफिज हा त्यावर प्रक्रिया करून त्यापासून जास्तीचे  नशा देणारे अंमली पदार्थ तयार करणार होता. त्यानंतर ते अंमली पदार्थ केनिया मार्फत ब्रिटनमध्ये पाठविण्यात येणार होते, असेही हाफिजने पोलिसांना सांगितले  आहे.