Breaking News

वरुणराजाच्या कृपेने तलाव ओव्हरफ्लो- थोरात

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - वरुण राजाने केलेल्या कृपेमुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. सर्व नदी, नाले, ओढे तुंडूंब भरुन वाहत आहेत. अनेक वर्षानंतर विसापूर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तालुक्याचे आ. राहुल जगताप यांच्या प्रयत्नाने कुकडी कॅनॉल ओव्हरफ्लोचे पाणी विसापूर तलावात सोडण्यात आले. वरुणराजाच्या झालेल्या कृपेमुळे तलाव ओव्हरफ्लो झाला. आहे. कुकडी सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वासराव थोरात आणि संचालकांनी येथील विसापूर तलावाचे जलपूजन केले. यावेळी ते बोलत होते.  
ते म्हणाले, तलाव भरल्याने विसापूर खालील पिंपळगाव पिसा, बेलवंडी, लोणी व्यं., चिंभळा, पिसोरे बु. घारगाव, शिरसगाव बोडखा या गावांचा पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. तसेच विसापुर  तलावाशेजारील विसापुर, सुरेगाव, उख्खलगाव, निंबवी, चांभुर्डी, मुंगूसगाव, कोरेगव्हाण या गावांचाही पाणी प्रश्‍न सुटणार आहे. अशा या आनंददायी वातावरणात कुकडी परिवाराच्यावतीने जलपूजनाचा कार्यक्रम होत आहे, ही मोठी आनंदाची बाब आहे.
यावेळी कुकडी सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एकनाथ बारगुजे, संचालक विनायकराव लगड, अंकुशराव रोडे, विवेक (आबा) पवार, धंनजय शिंदे, सुभाष शिर्के, बी. एल. कदम, सरपंच अनिल मोरे, नाथाभाऊ शेंडगे, मच्छिंद्र नलगे, सरपंच काकासाहेब शिर्के,  चेअरमन आप्पासाहेब शिंदे, सरपंच अरविंद जठार, उपसरपंच विलास लगड, मा. सरपंच भाऊ शिंदे, चेअरमन विठ्ठल कर्डिले, सचिन जठार, गुलाबराव रामफळे, रामकृष्ण रोडे, गावडे सर, मा. सरपंच प्रमोदनाना जगताप, नितीनआण्णा डुबल, किरण गावडे, कुकडी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, शेतकी अधिकारी सुभाष कुताळ, कल्याण जगताप, आप्पासाहेब खरात, बापुराव पारखे, सुरेश भापकर, नारायण शिंदे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.