Breaking News

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त; नव्या नियुक्त्या होणार

जळगाव, दि. 30, सप्टेंबर - जळगाव जिल्ह्याकरिता राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरावरील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या नव्याने नियुक्त्या केल्यामुळे सर्व जुन्या कार्यकारिण्या  बरखास्त केल्या आहेत. नव्या कार्यकारिणी लवकरच जाहीर करून नवीन ऑक्टोबर महिन्यापासून तालुकानिहाय दौरे केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष  आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिला जिल्हाध्यक्षपदी कल्पना पाटील, महानगर अध्यक्षपदी नीलेश पाटील, महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निला चौधरी, युवती जिल्हाध्यक्षपदी कल्पिता  पाटील, युवक जिल्हाध्यक्षपदी ललित बागुल, युवक महानगर अध्यक्षपदी विशाल देवकर, युवती महानगराध्यक्षपदी सायली जाधव यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा  समन्वयक म्हणून विकास पवार यांना कायम ठेवले आहे. माजी महिला जिल्हाध्यक्ष विजया पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, किसान सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सोपान  पाटील, ओबीसी आघाडीवर उमेश नेमाडे, सविता बोरसे, सोशल मीडिया सेलवर अक्षय चौधरींची नियुक्ती करण्यात आली आहे.