Breaking News

जळगाव तालुक्यातील सरपंच, 49 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध

जळगाव, दि. 30, सप्टेंबर - जळगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये वराड बुद्रुक, कुवारखेडे सावखेडे खुर्द या ग्रामपंचायतीचे सरपंचपदांसह 49  ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडूण आले आहेत. बुधवारी सरपंचपदासाठीच्या सदस्यपदाच्या 36 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता 11  ग्रामपंचायतींमध्ये 71 सदस्य 24 सरपंच रिंगणात आहेत.
तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत सरपंचपदासाठी 36 तर सदस्यपदासाठी 161 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीमध्ये सदस्यपदाचे  उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. बुधवारी सरपंचपदाच्या निवडणुकीतून वसंतवाडी 1, कुवारखेडे 1, किनोद 2, विदगाव 2, घार्डी 2, भोलाणे ग्रामपंचातीतून एका  उमेदवाराने माघार घेतली आहे. तर वसंतवाडी 4, कुवारखेडे 12, किनोद 4, भादली खुर्द 4, विदगाव 5, घार्डी भोलाणे ग्रामपंचायतीतून सदस्यांनी माघार घेतली  आहे.
बिनविरोध निवडलेले सदस्य
जळके 6, वसंतवाडी 5, वराड बु.7, कुवारखेडे 2, किनोद 7, सावखेडे खुर्द 7, भादली खुर्द 2, विदगाव 6,सुजदे ,भोलाणे 1.