Breaking News

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी भरत कळसकर

नाशिक, दि. 01, सप्टेंबर - नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंदयांची बदली झाल्याने त्यांच्या जागी भरत कळसकर यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यात  आली आहे. कळसकर हे नाशिकमध्येच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्‍न गंभीरतेने हाताळून  लहान वाहनचालकांना कमी शुल्कात परवाना मिळवून दिला. नाशिकमधील शालेय वाहतुकीप्रमाणेच हीच योजना राज्यभर राबविणार असल्याची माहिती एका  सार्वजनिक कार्यक्रमात दिली होती. कळसकर यांच्या जागी कुणाची नियुक्ती करण्यात आली हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.