Breaking News

सुरक्षित रेल्वे प्रवसासाठी आता ’इस्रो’ची मदत होणार

नवी दिल्ली, दि. 30, सप्टेंबर -  रेल्वे अपघाताच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे सुरक्षेसाठी रेल्वे  मंत्रालय आता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोची मदत घेणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये माहिती  दिली.
गेल्या काही महिन्यात अनेक रेल्वे अपघात झाले. या अपघातांची नैतिक जबाबदारी घेत सुरेश प्रभूंनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र  त्यांची पदावरुनच उचलबांगडी करत त्यांना वाणिज्य मंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आणि पियुष गोयल यांची रेल्वेमंत्रिपदी निवड झाली. मात्र रेल्वे अपघातांच्या  घटना बंद झाल्या नाहीत.
रेल्वेत अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करत रेल्वेच्या सुरक्षेसाठी पावलं उचचली जातील. यासाठी इस्रो आणि रेलटेल सोबत काम करतील. त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच  इस्रोची अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांची भेट घेतली, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. रेल्वे सुरक्षेसंदर्भातल इस्रोच्या अध्यक्षांसोबतची चर्चा डोळे  उघडणारी चर्चा होती. अनेक गोष्टींमध्ये काय उपयोजना करु शकतो आणि त्यासाठी अवकाश तंत्रज्ञानाची कशी मदत होऊ शकते, याबाबत मीही उत्सुक आहे. रेल्वे  प्रवास सुखकर करण्यासाठी इस्रोच्या विकसित अवकाश तंत्रज्ञानाच्या मदत होईल., असेही पियुष गोयल यांनी सांगितले.