Breaking News

समाजसेवी संस्थांनी केला जळगाव शहरात निर्माल्य संकलन मोहिमेचा श्री गणेशा!

जळगाव, दि. 02, सप्टेंबर - गणेशोत्सवात श्रीगणेशाचे दरवर्षी आगमन होते. या उत्सवात घरापासून ते शहरातील वॉर्ड, चौक, सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशाची  भक्तीभावनेने स्थापना करण्यात येते. घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होत असते. साधारणपणे संपुर्ण शहरातून 100 ते  150 टन निर्माल्याची योग्य तर्हेने व्यवस्थापन केल्यास नदी व पर्यावरणाचे होणारे प्रदूषण आपण टाळू शकतो. याच विचारात जिल्हाप्रशासनाने पुढाकार दर्शविला  असून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहर निर्माल्य संकलन मोहिम कार्य समितीची बैठक 31 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,  जळगाव येथे संपन्न झाली. यावेळी जळगाव शहर निर्माल्य संकलन मोहिम कार्य समिती - वर्ष 2017 गठित करण्यात आली. कार्य समितीत मल्टी मीडिया फिचर्स प्रा  लि ही संस्था मोहिमेचे समन्वयक म्हणून कार्य करणार असून उपस्थित विविध सामाजिक संस्था, महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योजक इ. सर्व उपस्थित मंडळी सदस्य  म्हणून आपला सक्रिय सहभाग देणार आहेत. शहरातील वॉर्डनिहाय आखणी करुन विविध महाविद्यालयातील जवळपास 400 हून अधिक विद्यार्थी या मोहिमेत  सहभागी होऊन निर्माल्य संकलन करणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकार्यांसमक्ष केशव स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने भानुदास येवलेकर, दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेचे गोविंद खांदे, जळगाव जनता सहकारी बँकेचे  कृणाल महाजन, विभागीय वनअधिकारी आदर्श रेड्डी, जि.प.चे डेप्युटी सीईओ बोटे, एम.जे. कॉलेज प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी, जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. प्रिती अग्रवाल, शेख रफिक जमील, राज कांकरिया, डॉ. रितेश पाटील, जयदीप शाह, बाहेती महाविद्यालयाच्यावतीने प्रा. राहुल बनसोड, आय.एम.आर.  कॉलेजच्या डॉ. शमा सराफ, पर्यावरण शाळेच्या सौ.चेतना नन्नवरे, संदीप झोपे, वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे, रविंद्र सोनवणे,  निलेश ढाके, भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी, गोपाल शिंपी, हरित सेनेचे प्रविण पाटील, अक्षय सोनवणे, रोटरी वेस्टचे नितीन रेदासनी, आशा फाऊंडेशनचे  गिरीश कुळकर्णी, पारख प्लेक्सस् रिअल्टी लि.चे विनय पारख, जळगाव फर्स्टच्यावतीने अजय पाटील, सुष्मिता भालेराव, उद्योजक रमेशकुमार मुणोत, वर्धिष्णु  सोसायटीचे अद्वैत दंडवते, जगदीश बोरसे, रोटरॅक्ट क्लब जळगावचे प्रतिनिधी, जि.प.चे उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड, युवाशक्ती फाउंडेशनचे विराज  कावडीया, अमित जगताप, भूषण सोनवणे, नांद्रा बु.॥ येथील मोरया ग्रुपचे ज्ञानेश्‍वर सोनवणे, निखिल चव्हाण, किरण घुले जळगाव शहर मनपाचे आरोग्याधिकारी  विकास पाटील, जिल्हा माहिती अधिकारी बोडके व मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि.चे सुशील नवाल, रत्नेशकुमार पाण्डेय, निलेश ठाकरे हे सदर बैठकीस उपस्थित  होते.
शहरातील निर्माल्य संकलन कामी सातत्याने पुढाकार घेणार्या सेवाभावी संस्थेंचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यात चर्चा होऊन जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली  या उपक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जनसहभागातून सहकार्य मिळावे, असे आवाहन करण्यात आले. ज्यांना याकामी आपले योगदान व श्रमदान द्यावयाचे  आहे त्यांनी आपली नावनोंदणी सकाळी 11 ते सायं. 5 या दरम्यान आकाशवाणी केंद्रासमोरील, रिंग रोड,जळगाव येथे मल्टी मीडिया फिचर्स प्रा.लि.च्या कार्यालयात  नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.