Breaking News

मिरीकर वाड्यातील गणपती

अहमदनगर, दि. 02, सप्टेंबर - निजामशाहीची राजधानी असलेल्या नगर शहराची स्थापना 1490 मध्ये झाली. त्या अगोदरच्या नवनाथकालीन भाविकांची अष्टविनायक हि उपासना स्थाने असावीत असे इतिहासात सांगितले जाते. माळीवाड्यातील विशाल गणपतीचा अपवाद वगळता इतर सर्व गणेश मूर्ती देवीच्या तांदळाच्य रूपात दिसतात.या अष्टविनायकापैकी एक जुन्या जिल्हा न्यायालयामागील सरदार मिरीकर वाड्यातील गणपती आहे.उजव्या सोंडेचा हा गणपती वाड्याच्या दर्शनीभागाच्या कोपर्‍यात जमिनीखाली आहे.ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर व त्यांचे कुटुंबीय गणपतीची रोज पूजा करतात.हे एक जागृत देवस्थान आहे.सादर गणेशाची मूर्ती भक्तांचे आकर्षण आहे, मूर्तीच्या  रुपाकडे पहिले असता मन प्रसन्न होते.अनेकांच्या नवसाला पावणारा हा गणेश आहे असे गौरव मिरीकर यांनी सांगितले.नगरमधील 8 गणेशाची स्थाने शहरातील अनेक भाविकांपासून दुर्लक्षित आहेत ,या आठ गणेशाची पूजा परिसरातील काही गणेश बी हाकत व ज्या वाड्यात गणेश मूर्ती आहे त्या वाड्यातील कुटुंब गणेशाची मनोभावे पूजा करतात. मिरीकर वाड्यातील गणपती तांदळाच्या अक्षदा सारखा वाटतो.हे स्थान खूप जुने असल्याने ते जमिनीच्या समांतर  खाली आहे .बाहेर गावावरून भाविक त्या ठिकाणी दर्शनास येतात. दर्शनानंतर वेगळीच अनुभूती येते असे भाविक सांगतात. प्रत्येक चतुर्थीला  दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते.