Breaking News

वाळके वाड्यातील गणपती

अहमदनगर, दि. 02, सप्टेंबर - नगर शहरामधे आठ स्वयंभू गणपती आहेत. नगरमधिल भाविकांची ही श्रद्धास्थाने आहेत. या अष्ट विनायकांपैकी एक गणपती म्हनजे वाळके वाड्यातिल गणपती.हे गणेश मंदिर शहरामध्ये कोर्टाच्या पाठीमागे टांगेगल्ली मध्ये वाळके वाड्यात आहे.ही गणेश मूर्ती डाव्या सोंडेची आहे. वाळके वाड्यातील गणेशमूर्ती स्वयंभू आहे. जवळ्पास 750 वर्षापूर्वी या मूर्तीची निर्मिती झाली.1490 च्या पुर्वी म्हणजे निजामशाहिच्या आधी नगर शहर वसण्याआधी नवनाथकालीन ही मूर्ती आहे. या मूर्तीचे अवयव वाढत हते.त्यामुुळे मंदिर बांधन्यात  आले. या मूर्तीबाबत भाविक असे सांगतात की ही मूर्तीचा आकार आजही थोडा थोडा वाढत आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेपाच ़फूट आहे. ही आकर्षक मूर्ती भक्तांचे मन मोहून घेते. नगरमधिल भाविक खूप भक्तीभावाने पुजतात. नवसाला पावणारा गणपती असा याचा नावलौकीक आहे. आजही या गणेशाच्या  चमत्काराची प्रचिती येते असे वाड्यातिल लोक सांगतात. वाळके कुटुंबिय अत्यंत मनभावे याची सेवा करतात.वर्षभरामध्ये या ठिकाणी हवन पुजा-अर्चा चालू  असते. गणेश उत्सवामध्ये जिल्हाभरामधून भाविक  खुप भक्तिभावाने याठिकाणी दर्शनास येतात.