Breaking News

स्मार्ट सिटी कागदोपत्री नको, स्मार्ट कृती हवी -प्रवीणसिंग परदेशी

सोलापूर, दि. 24, सप्टेंबर - स्मार्टसिटीच्या कामांचे नियोजन वेळेनुसार करा. यापुढे कागदोपत्री कामे करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामास सुरुवात करा. पुरातन विभागाकडून  अडचण येत असेल ते शासनाकडून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत सोलापूरचे पालकसचिव प्रवीणसिंग परदेशी यांनी व्यक्त केले. स्मार्ट सिटी कंपनीची  आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते. पुरातन विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे 50 कोटींचे काम थांबले आहे. त्यासाठी परदेशी  यांनी राज्यमार्फत केंद्र सरकारकडून योग्य ती परवानगी 15 दिवसांत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नोव्हेंबर  महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत, असे सांगण्यात आले. उड्डाणपुलावरचर्चा : स्मार्टसिटी एरियात येत असलेल्या उड्डाणपुलाबाबत चर्चा झाली.  यात भूसंपादन करण्यात येणार आहे. या जागा मालकांची बैठक यापूर्वी घेण्यात आली. महापालिका आयुक्तांनी ती घेतली. पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला.
स्मार्ट सिटीचे काम सुरू व्हावे शहरातस्मार्टसिटीचे काम सुरू व्हावे. त्यातील कामाची माहिती घेण्यासाठी बैठक झाली. 2019 पर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन  करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना कामे सुरू झालेले दिसतील, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
परदेशी यांनी घेतला पदभार सोलापूरचेपालक सचिव म्हणून मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी आनंद कुलकर्णी हे  पालकसचिव होते. ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याऐवजी परदेशी यांची निवड करण्यात आली. ते पंधरा दिवसातून एकवेळ सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री  विजयकुमार देशमुख यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. पहिली बैठक शनिवारी शासकीय विश्रामगृहात घेतली.