Breaking News

परराज्यात जाणार्‍या भाजीपाल्यासाठी स्वतंत्र रेल्वे बोगी - खा. हरीशचंद्र चव्हाण

नाशिक, दि. 28, सप्टेंबर - रेल भवन नवी दिल्ली येथे खासदार हरीशचंद्र चव्हाण यांनी मागील 15 दिवसांपासून नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून पर राज्यात  जाणारा भाजीपाल्यासाठी रेल्वे बोग्या उपलब्ध नसल्याने नाशिक रोड स्थानकावर सडून जात आहे. या संदर्भात खा.चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची  दिल्लीत भेट घेतली. याबैठकीत रेल्वे मंत्रालयाने त्वरित बोग्या उपलब्ध करून देण्याची मागणी खा. हरीशचंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे  केली. यावेळी पियुष गोयल यांनी रेल्वे बोर्डाच्य संबंधित अधिकार्‍यांना बरोबर बैठक घेतली. 
या बैठकीत खा. हरिशचंद्र यांनी केद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भाजीपाल्यासाठी बोग्याभावी शेतीमाल सडून जातो आणि शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. या विषयी  केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याची गंभीर दखल घेत बोग्या त्वरित उपलब्ध करून देण्याचे अधिकार्‍यांना आदेश दिले. या बैठकीत मागणी वाढल्यास संपूर्ण भारतात  प्रवासी गाड्यांनासुद्धा पार्सल व्हॅन जोडण्याचे आदेश देऊ असे ही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं.
या बैठकीत खा. हरिशचंद्र चव्हाण यांच्याबरोब ऑल इंडिया द्राक्ष बागायतदार संघ अध्यक्ष जगन्नाथ खापरे, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले , रेल्वे  झेडआरयुयुसी मेम्बरला महेंद्र शाहीर उपस्थित होते. रेल्वेमंत्रालयाचे सचिव नरेंद्र पाटील, सल्लागार कोचिंग सदस्य, रेल्वे बोर्ड पुरुषोत्तम गुहा यांनीही उपस्थिती  लावली.